बार्शी तालुका पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांसह कर्मचारी नेहमीच प्रयत्नशील
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, ( सोलापूर जिल्हा )
सौ. कलावती गवळी प्रतिनिधी
बार्शी तालुका पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये एका शेतकऱ्याचा ट्रॅक्टर चोरीस गेल्याची फिर्याद बार्शी तालुका पोलीस ठाण्यात दाखल होती, यानंतर बार्शी तालुका पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला तांत्रिक विश्लेषण गुप्त माहिती आणि सीसीटीव्ही फुटेच्या आधारे केवळ 12 तासांत आरोपींचा शोध घेवुन बेड्या ठोकल्या आहेत, या कारवाईत आरोपींना विविध ठिकाणावरून ट्रॅक्टर दोन ट्रेलर छकडा व मोबाईल असा एकूण जवळपास 55 लाख 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला, बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या पथकांने ट्रॅक्टर चोरणाऱ्या एका टोळीच्या मुसक्या आवळल्या असून त्या अनुषंगाने या उल्लेखनीय कामगिरीबद्दल माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी विशेष कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना व पोलीस हवालदारांना ट्रॉफी प्रशस्तीपत्रक व बक्षीस देवुन त्यांना गौरविण्यात आले आहे, बार्शी तालुका पोलिसांच्या या कामगिरीमुळे सध्या नागरिकांमध्ये पोलिसांविषयी विश्वास वाढला असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने हा तपास अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे, बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे पोलीस उपनिरीक्षक बालाजी वळसणे पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र मंगरुळे सुभाष सुरवसे राहुल बोंदर आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला होता
