अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात
अजिंक्य महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी संभाजी पुरीगोसावी
सातारा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज सुधाकर करपे सर यांची सातारा जिल्हा सिव्हिल हॉस्पिटलमधील त्यांच्या दालनात संभाजी पुरीगोसावी सातारकर यांनी सदिंच्छा भेट घेतली, डॉ. युवराज सुधाकर करपे यांनी सातारा जिल्हा रुग्णालयाचा पदभार घेतल्यापासून गोरगरिब व सर्वांच्या सेवेसाठी नेहमीच प्रयत्नशील, डॉ. युवराज करपे हे मूळचे वाई तालुक्यांतील असून वैद्यकीय क्षेत्रामध्ये तब्बल 23 वर्षे सक्रिय राहून त्यांनी रुग्णसेवा केली आहे, डॉ. करपे यांनी शासकीय महाविद्यालय मिरज येथे एमबीबीएस एसची डिग्री प्राप्त करून कराड येथील कृष्णा वैद्यकीय महाविद्यालयातून एमडी स्त्रीरोग तज्ञ म्हणून पदवी प्राप्त केली होती, ऑगस्ट 2000 मध्ये डॉ. युवराज करपे शासकीय सेवेत दाखल झाले होते, सुरुवातीला पिंपोडे येथून कारकिर्दीला त्यांनी प्रारंभ केला होता, या यापूर्वीचे तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे डॉ .अमोद गडकरी डॉ. सुभाष चव्हाण यांनी सातारा जिल्हा रुग्णालयात उत्कृंष्ट सेवा केली
