अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात…!
प्रतिनिधी : संभाजी पुरीगोसावी.
मनीषा आव्हाळे यांची उल्हासनगरच्या महापालिका आयुक्त पदावर नियुक्ती, सातारा,सोलापूर,पुणे जिल्ह्यात उत्कृंष्ट सेवा, संभाजी पुरीगोसावी (पुणे जिल्हा) प्रतिनिधी. उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्तपदी भारतीय प्रशासकीय सेवेतील मनीषा आव्हाळे यांची नियुक्ती झाली आहे, मनीषा आव्हाळे यांनी यापूर्वीं सहाय्यक जिल्हाधिकारी सातारा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर तर पुणे स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या, त्यांच्या नियुक्तीने उल्हासनगर महापालिकेला पहिल्यांदाच महिला आयुक्त मिळाल्या आहेत, येत्या काळातील महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेली नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे, महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांची नियुक्ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयात उपसचिव पदी नुकतीच नियुक्ती झाली आहे, ढाकणे यांचा उल्हासनगर महापालिकेतील हा अल्प कार्यकाल ठरला आहे, त्यांच्याकडून महापालिकेला आर्थिक शिस्त लावण्याची अशा होती, मात्र त्यांची तत्पूर्वीच बदली झाली आहे, आयुक्त पदावर कुणाची वर्णी लागतंय, यांच्या चर्चा रंगल्या होत्या, मात्र पुणे स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांची महापालिका आयुक्त पदी नियुक्ती झाली असून, त्यांनी महापालिका आयुक्त पदाचा पदभार देखील स्वीकारला आहे.
