सौ. रूपाली चाकणकर | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी : संभाजी पुरीगोसावी.
महिला आयोगांच्या अध्यक्षपदी पुन्हा सौ. रूपाली चाकणकर, कार्यकाळ संपण्याआधींच नियुक्तीचे गॅझेट जारी, नगरसेविका ते महिला आयोगांच्या अध्यक्षा असा प्रवास, संभाजी पुरीगोसावी ( पुणे जिल्हा ) प्रतिनिधी. महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पुन्हा सौ. रुपाली चाकणकर यांचीचं नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या 22 तारखेला चाकणकर यांचा कार्यकाळ संपणार होता, मात्र तत्पूर्वीच आयोगांच्या अध्यक्षपदाची धुरा पुन्हा चाकणकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. राज्यपाल नियुक्त : 12 आमदारांपैकी सात आमदारांचा काल शपथविधी पार पडला. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनाही विधान परिषदेची आमदारकी मिळणार असल्याची चर्चा होती. मात्र त्यांच्या नावाला पक्षातून चांगलाच विरोध होता एकाच व्यक्तीला सगळी पदे देणार का, असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरेंनी विचारला होता, राज्यपालांकडे पाठवण्यात आलेल्या यादीत चाकणकरांचे नाव नव्हते त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्यामुळे हे पद राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याचे स्पष्ट झाले चाकणकरांचा कार्यकाळ येत्या 22 ऑक्टोंबर ला संपणार होता, रूपाली चाकणकरांचा नगरसेविका ते महिला आयोगाच्या अध्यक्षा असा त्यांचा प्रवास आहे, दौंड मधील शेतकरी कुटुंबात चाकणकरांचा जन्म झाला होता. रयत शिक्षण संस्थेतील साधना महाविद्यालयात त्यांनी शिक्षण घेतले पुढे त्यांनी अधिकारी होण्यासाठी स्पर्धा परीक्षांचही अभ्यास सुरू केला होता, लग्नानंतर सासरच्या चाकणकर कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे रूपाली चाकणकर यांचाही राजकारणात प्रवेश झाला होता, रूपाली चाकणकर यांची ओळख महिला प्रश्नांवर लढणारे आणि पक्षाची बाजू खंबीरपणे मांडत विरोधकांना सडेतोड उत्तर देणाऱ्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात, महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ हा तीन वर्षाचा असतो महिला आयोगाचा अध्यक्षाची आणि सदस्यांची निवड ही राज्य सरकारकडूंन होते.
