मधु तारा फाउंडेशन | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी : कार्यकारी संपादक : किरण सोनवणे.
9 ऑक्टोबर 2024 रोजी रस्ते अपघातात मणक्याला इजा पोहचल्या मुळे शारीरिक व्यंगतव आलेल्या चिंतामणी नगर सावंगी तालुका जिल्हा वर्धा येथील तरुण श्री विकास नगराळे यांना मधु तारा दिव्यांग सेवा सोशल फाऊंडेशन यांच्या वतीने मोफत व्हीलचेअर भेट देण्यात आली.
या वेळी विकास यांनी हॉस्पिटल उपचारानंतर काही महिने बेड वरच असल्या कारणाने आणि थेरपी उपचार घेण्यासाठी मधु ताराला व्हीलचेअरची मागणी केली होती.
मधु तारा प्रमुख हे वर्धा आणि नागपूर दौऱ्यावर असल्याने मधु तारा प्रमुख श्री नितीनजी शिंदे आणि मधु तारा प्रमुख संस्थापक विश्वस्त अश्विनी गिरटकर मॅडम यांनी आज त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली.
या वेळी मधु तारा फाऊंडेशनचे दिवंगत संस्थापक विश्वस्त किरण शेंद्रे यांचीही आठवण काढत श्री विकास नगराळे यांनी मधु ताराचे आभार मानले.
या वेळी मधु तारा प्रमुखांनी मधु तारा सोबती कोल्हापूर शिरोळ येथील मोफत रहिवासी आणि फिजिओ थेरपी देणाऱ्या संस्थेशी बोलून काही दिवसात तिथे विकास यांना उपचार तिथे देऊ असे सांगितले.तसे फोन वर चर्चा सुध्धा करून विकास यांच्याशी बोलण करून दिले असल्याने विकास हे खूप भारावून गेले आणि मधु तारा सारखे कार्य हे आपण कधीही आयुष्यात बघितले नाही असे म्हणत.
विकास यांना अश्रू अनावर झाले आपण ही मधु तारा सोबत कायम राहून दुसऱ्यांनाही मदत करत राहू असे सांगितले.*
*या वेळी खरंच हेच जाणवते की मधु तारा प्रत्येकांसाठी प्रत्येक जण मधु तारा साठी कारण याच भावनेतून राज्यभरातील खरे सामाजिक नैतिक्तेतून सामाजिक बांधिलकी जपणारे असंख्य लोक मधु ताराशी जोडले गेले आहेत.
