एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

एमटीडीसीमार्फत जागतिक पर्यटन दिनानिमित्त आज विविध कार्यक्रम.

नागपूर | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज‌ | प्रतिनिधी सतीश कडु.

‘पर्यटन आणि शांतता’ हे यंदाच्या पर्यटन दिनाचे घोषवाक्य

नागपूर, दि. 26 : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत पर्यटन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन दि. 27 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता प्रेस क्लब येथे करण्यात आले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती वी.एस. शिरपूरकर असतील.

युनायटेड नेशन टुरिझमद्वारे या वर्षासाठी ‘पर्यटन आणि शांतता’ हे जागतिक पर्यटन दिनाचे घोषवाक्य घोषित करण्यात आले आहे. या दिनाचे औचित्य साधून पर्यटन महामंडळाच्या नागपूर प्रादेशिक कार्यालयामार्फत ‘पर्यटन व शांतता’ या विषयाच्या अनुषंगाने परिसंवाद, चित्रकला व निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

निबंध स्पर्धेसाठी पर्यटन : शांतता स्थापित करण्याचे एक साधन, पर्यटन व जागतिक शांतता, महाराष्ट्राची पर्यटन स्थळे व त्यांचा शांतता संदेश, माझ्या स्वप्नातले पर्यटन, भारत व पर्यटन : शांततेचे दूत आणि प्रतिक असे विषय ठेवण्यात आले आहेत. जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून ‘पर्यटन व शातंता’ या घोषवाक्याशी निगडीत प्रत्येक प्रादेशिक व्यवस्थापकांच्या अखत्यारितील शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा देखील आयोजित करण्यात येणार आहेत.

निबंध आणि चित्रकला स्पर्धेतील प्रथम पारितोषिक विजेत्याला पर्यटक निवासात दोन व्यक्तींना २ रात्री ३ दिवस राहण्याची व्यवस्था, प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह. व्दितीय पारितोषिक विजेत्याला पर्यटक निवासात २ व्यक्तींना १ रात्र २ दिवस राहण्याची व्यवस्था + प्रमाणपत्र + स्मृतीचिन्ह , तृतीय पारितोषिक विजेत्याला जवळच्या पर्यटक निवासात २ व्यक्तींना १ दिवस राहण्याची व्यवस्था दुपारचे जेवण प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह अशी पारितोषिक ठेवण्यात आली असल्याचे वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक दिनेश कांबळे यांनी कळविले आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link