एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

देवाची आळंदी येथे राष्ट्रमाता जिजाऊ इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या दीपा वाघ व समन्वयक कृष्णराव देशमुख यांचा राज्यस्तरीय सन्मान!

देवाची आळंदी येथे राष्ट्रमाता जिजाऊ इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या दीपा वाघ व समन्वयक कृष्णराव देशमुख यांचा राज्यस्तरीय सन्मान!

प्रतिनिधी- सारंग महाजन.

चिखली : ‘ओळख श्री ज्ञानेश्वरी’ या पुस्तकाच्या तृतीय आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त देवाची आळंदी येथे ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आयोजित विशेष कार्यक्रमात राज्यातील सुमारे अडीचशे शाळांमधील संस्था पदाधिकारी, प्राचार्य व अध्यापकांचा सन्मान करण्यात आला. या गौरव सोहळ्यात चिखली येथील राष्ट्रमाता जिजाऊ इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या दीपा वाघ आणि समन्वयक कृष्णराव देशमुख यांना सन्मानित करण्यात आले.

‘ओळख श्री ज्ञानेश्वरी’ या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संत साहित्य, आध्यात्मिक विचार, नैतिक मूल्ये आणि भारतीय संस्कृतीचे संस्कार रुजविण्याचा स्तुत्य प्रयत्न केला जात आहे. या उपक्रमात सहभागी शाळांच्या प्रतिनिधींचा सन्मान करून त्यांच्या शैक्षणिक योगदानाची दखल घेण्यात आली.

आळंदी या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पावन भूमीत झालेला हा सन्मान राष्ट्रमाता जिजाऊ इंग्लिश स्कूलसाठी अभिमानास्पद ठरला आहे. या गौरवाबद्दल नगराध्यक्ष तथा संस्थेचे अध्यक्ष पंडितदादा देशमुख, इतर संचालक शिक्षकवृंद व शिक्षणप्रेमींनी प्राचार्या दीपा वाघ आणि समन्वयक कृष्णराव देशमुख यांचे अभिनंदन केले.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link