दिवा पोलीसांची उल्लेखनीय कामगिरी; बेपत्ता अल्पवयीन मुलीची आंध्रप्रदेशातून सुटका
प्रतिनिधी मुकुंद मोरे
दिवा, मुंब्रादेवी कॉलनी येथील तन्वी वय १५ ही अल्पवयीन मुलगी दोन महिन्यांपूर्वी दुकानात जाते असे सांगून बेपत्ता झाली होती.
या प्रकरणी मुंब्रा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. जामसुतकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय श्री. अनिल सोनवणे आणि त्यांच्या टीमने जलद तपास करत आंध्रप्रदेशातून मुलीला व संबंधित मुलाला ताब्यात घेऊन दि. २९/०८/२०२६ रोजी दिवा पोलीस ठाण्यात आणले. आरोपीवर गुन्हा दाखल करून लॉक-अप मध्ये टाकण्यात आले आहे.
याबाबत शिवसेना उद्धवजी ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख श्री. सचिन दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर समन्वयिका सौ. प्रियंका नितीन सावंत यांनी सिनियर पी.आय. जामसुतकर साहेब यांची भेट घेऊन मुलीची वैद्यकीय तपासणी करून तिला समुपदेशनासाठी वुमन सेंटरला पाठवण्याची मागणी केली, जी साहेबांनी तात्काळ मान्य केली.
मुलगी सुखरूप परत मिळाल्याने आई-वडील व नातेवाईकांनी पोलिसांचे व प्रियंकाताई सावंत यांचे आभार मानले.
या उत्कृष्ट कामगिरीबद्दल शिवसेना उद्धवजी ठाकरे पक्षाच्या वतीने एपीआय श्री. अनिल सोनवणे साहेबांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.त्यांच्या टीमचे आभार मानले.
यावेळी शहर समन्वयिका सौ. प्रियंका नितीन सावंत, श्री. नितीन सावंत, श्री. संजय निकम, श्री. योगेश निकम आदी पदाधिकारी उपस्थित होते.








