सहदेवनगर गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी प्रतिक चोथवे; खजिनदारपदी सोहम चांदवडकर
प्रतिनिधी रवींद्र पाटील
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सहदेवनगर गणेश मंडळाची बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत सन २०२६ साठी मंडळाची नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली.
मंडळाच्या अध्यक्षपदी प्रतिक चोथवे, उपाध्यक्षपदी मनीषाताई कहाणे, सचिवपदी मोहित हिरे, खजिनदारपदी सोहम चांदवडकर, तर कार्याध्यक्षपदी गायत्रीताई सोनवणे यांची निवड करण्यात आली.
यावेळी अध्यक्ष प्रतिक चोथवे यांनी सांगितले की, गणेशोत्सव अधिक नियोजनबद्ध पद्धतीने साजरा करण्यासाठी विविध नियोजन समित्या लवकरच जाहीर करण्यात येतील. तसेच यंदाचा गणेशोत्सव प्लास्टिकमुक्त आणि सर्वसमावेशक करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
बैठकीस प्रामुख्याने मीराबाई चोथवे, समाधान आहिरे, संदीप बडगुजर, भास्करराव भावसार, विजय चौधरी,रविंद्र पाटील, हर्ष शिरसाठ, सायलीताई गांगुर्डे, सविताताई चोथवे, कार्तिकीताई चोथवे, मालतीताई मंडलिक, स्मिताताई बडगुजर, वैशालीताई चौधरी, यश शिंदे,यश कहाणे, अर्जुन जाधव, धीरज पाटील,अरिहंत खैरनार आणि दिनेश देवी आदी गणेश भक्त उपस्थित होते.








