आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर नशिराबाद पोलीसांचा रूट मार्च कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवा:- स.पो.नि. योगिता नारखेडे यांचा संदेश!
(जळगांव जिल्हा )
उप संपादक प्रणित काठोके
आगामी सण उत्सवाच्या काळात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता नशिराबाद पोलिसांनी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली नशिराबाद पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये रुट मार्च काढून आगामी सण उत्सव शांततेत साजरे करा, आणि चुकीला माफी नाही, असे आव्हान करीत नशिराबाद पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली रुट मार्च संपन्न झाला. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांनी आगामी सण उत्सव साजरे करा पण शांततेत करा, जातीय तेढ निर्माण होऊ नये सोशल मीडियावर कोणाचे मन दुखवेल असे गैरवर्तन करणाऱ्यांना माफी नाही, असा संदेशात सर्व जनतेंने आगामी सण उत्सव काळात शांततेचे सहकार्य पोलिसांनाही करायचे आहे असे आवाहन नशिराबाद पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांनी केले आहे.*








