एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

युरिया खत विक्रीतील गैरप्रकाराची तक्रार – प्रशासनाची कारवाई अपुरी; परवाना रद्द करण्याऐवजी केवळ १५ दिवसांचे निलंबन

युरिया खत विक्रीतील गैरप्रकाराची तक्रार – प्रशासनाची कारवाई अपुरी; परवाना रद्द करण्याऐवजी केवळ १५ दिवसांचे निलंबन

उपसंपादक गणेश नंदकुमार महाडिक

 

यांनी हवेली तालुक्यातील मे. महालक्ष्मी शेती भांडार यांच्याविरोधात युरिया खत विक्री करताना इतर खते किंवा कृषी उत्पादने खरेदी करण्याची सक्ती (Linking/Tie-in Sale), शेतकऱ्यांची फसवणूक, कृत्रिम टंचाई निर्माण करणे तसेच खत नियंत्रण नियमांचे उल्लंघन होत असल्याची लेखी तक्रार संबंधित कृषी विभागाकडे दाखल केली होती.

सदर तक्रारीची दखल घेत कृषी विभागाने संबंधित विक्रेत्यावर कारवाई केली असून त्यांचा खत विक्री परवाना १५ दिवसांसाठी निलंबित करण्यात आल्याचे समोर आले आहे.

मात्र, तक्रारीत मांडलेले आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे होते. शेतकऱ्यांना युरिया मिळण्यासाठी इतर उत्पादने खरेदी करण्यास भाग पाडणे, उपलब्ध साठा असूनही खत न देणे, तसेच खत नियंत्रण आदेशांचे उल्लंघन करणे या बाबी केवळ किरकोळ स्वरूपाच्या नसून शेतकऱ्यांच्या हिताला बाधा आणणाऱ्या आहेत.

त्यामुळे अशा गंभीर प्रकरणात केवळ १५ दिवसांचे निलंबन ही कारवाई अपुरी असून दोषी आढळलेल्या विक्रेत्याचा परवाना कायमस्वरूपी रद्द करणे, तसेच भविष्यात अशा प्रकारांना आळा बसेल अशी कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज 24 शेतकऱ्यांच्या हितासाठी अशा प्रकरणांचा सातत्याने पाठपुरावा करीत राहील व संबंधित प्रकरणात पुढील कायदेशीर पावले उचलण्याचा विचार करीत आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link