एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

मिशन क्रॅकडाऊन’चा धडाका; वडगाव शेरी, विमाननगरमध्ये मटका अड्ड्यांवर पोलिसांची धडक कारवाई

‘मिशन क्रॅकडाऊन’चा धडाका; वडगाव शेरी, विमाननगरमध्ये मटका अड्ड्यांवर पोलिसांची धडक कारवाई

पुणे | मुख्य संपादक : संतोष लांडे

पुणे शहराच्या पूर्व भागातील बेकायदेशीर धंदे, जुगार अड्डे, गावठी दारू, गुटखा आणि अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी परिमंडळ सातचे पोलिस उपायुक्त अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मिशन क्रॅकडाऊन’ ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत वडगाव शेरी आणि विमाननगर परिसरात पोलिसांनी धडक कारवाई करत गुन्हेगारीविरोधात कठोर भूमिका घेतली आहे.
परिमंडळ सातच्या हद्दीतील गुन्हेगारी टोळ्या, गावठी दारूची विक्री, गुटखा, जुगार अड्डे आणि अमली पदार्थांचे जाळे समूळ नष्ट करण्यासाठी पोलिस उपायुक्त अबिनाश कुमार यांनी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना कठोर निर्देश दिले आहेत. त्यानुसार विशेष पथकाने वडगाव शेरीतील साईनाथनगर परिसरात सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर अचानक छापा टाकला.
या कारवाईदरम्यान तीन दुचाकी, सहा मोबाईल फोन आणि जुगाराचे साहित्य असा एकूण २ लाख ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास चंदननगर पोलीस करत आहेत.
याशिवाय विमाननगर परिसरातील आणखी एका मटका अड्ड्यावरही पोलिसांनी कारवाई करून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले. ‘मिशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत आगामी काळातही अशाच धडक कारवाया सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, नागरिकांनी गुन्हेगारी टोळ्या, गुटखा, गावठी दारू, अमली पदार्थांची विक्री किंवा जुगार अड्ड्यांबाबत कोणतीही माहिती असल्यास ती तात्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलिस उपायुक्त अबिनाश कुमार यांनी केले आहे. माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असेही त्यांनी सांगितले

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link