एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

बोदवड येथील तरुणाच्या मृत्यूप्रकरणी कारवाईचा मुद्दा विधानसभेत; एकनाथराव खडसेंनी सरकारला धारेवर धरले

बोदवड येथील तरुणाच्या मृत्यूप्रकरणी कारवाईचा मुद्दा विधानसभेत; एकनाथराव खडसेंनी सरकारला धारेवर धरले

उप संपादक | प्रणित काठोके

जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथील हनुमान नगर परिसरातील तरुण सुनील दैवे यांच्या मारहाणीनंतर झालेल्या मृत्यूच्या प्रकरणाचा मुद्दा आमदार एकनाथराव खडसे यांनी विधानसभेत उपस्थित केला. या प्रकरणातील आरोपींवर तातडीने कारवाई करण्यात आली का, आरोपी फरार असल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाल्याची बाब खरी आहे का आणि शासनाने याबाबत कोणती पावले उचलली, अशी विचारणा त्यांनी केली.
यावर उत्तर देताना गृहराज्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, ११ मार्च २०२६ रोजी रात्री आरोपींकडून झालेल्या मारहाणीत सुनील देवे जखमी झाले होते. उपचारादरम्यान १९ मार्च २०२६ रोजी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून मृत्यूनंतर खुनाचे कलमही समाविष्ट करण्यात आले.
सरकारने दिलेल्या माहितीनुसार, प्रकरणातील पाच आरोपींपैकी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. एक आरोपीला न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला असून विधी संघर्ष बालक असलेल्या एका आरोपीला ताब्यात घेऊन नंतर न्यायालयाने जामिनावर मुक्त केले आहे.
तसेच, या प्रकरणाचा सखोल तपास पूर्ण करण्यात आला असून आरोपींविरुद्ध पुरावे गोळा करून ११ जून २०२६ रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची माहिती सरकारने सभागृहात दिली.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link