एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; चोपड्यात गावठी कट्टा, मॅगझिनसह आंतरजिल्हा टोळी जेरबंद, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; चोपड्यात गावठी कट्टा, मॅगझिनसह आंतरजिल्हा टोळी जेरबंद, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

उप संपादक | प्रणित काठोके

जळगाव स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि चोपडा शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत आंतरजिल्हा टोळीतील तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून गावठी कट्टा (पिस्तूल), दोन मॅगझिन, तीन मोबाईल फोन आणि एक कार असा एकूण ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
पोलीसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, काही इसम कारमधून विनापरवाना गावठी कट्टा घेऊन लासूर-चुंचाळे मार्गे चोपडा शहराकडे येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा आणि चोपडा शहर पोलिसांचे संयुक्त पथक तयार करून चोपडा-लासूर-चुंचाळे रस्त्यावरील शनिमंदिर परिसरात सापळा रचण्यात आला.
सायंकाळी सुमारे ७.३० वाजण्याच्या सुमारास संशयित Hyundai EON (MH-20 EE-6203) कार अडवून तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान आरोपींकडून एक गावठी कट्टा (पिस्तूल), दोन मॅगझिन तसेच तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले.
अटक करण्यात आलेले आरोपी
गणेश नानकुश माळी (३७), रा. कन्हाड खुर्द, ता. पाचोरा, जि. जळगाव
सचिन रोशन पवार (२४), रा. मयूर पार्क कॉलनी, गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर
अनिल कचरे साखुंबे (३७), रा. जाधव गल्ली, गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर
जप्त मुद्देमाल
गावठी कट्टा (पिस्तूल) व मॅगझिन – ₹६०,०००
अतिरिक्त मॅगझिन – ₹१०,०००
Hyundai EON कार – ₹५,००,०००
Oppo, Vivo व Redmi कंपनीचे तीन मोबाईल – ₹३०,०००
एकूण जप्त मुद्देमाल : ₹६,००,०००
याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा (Arms Act) कलम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चोपडा शहर पोलीस करीत आहेत.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link