एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

मुक्ताईनगरच्या आर्या महल्लेसह ११ विद्यार्थ्यांनी विकसित केले ‘चार्ज शेअर’ ॲप; ई-वाहन चार्जिंगसाठी ठरणार उपयुक्त

मुक्ताईनगरच्या आर्या महल्लेसह ११ विद्यार्थ्यांनी विकसित केले ‘चार्ज शेअर’ ॲप; ई-वाहन चार्जिंगसाठी ठरणार उपयुक्त

उप संपादक | प्रणित काठोके

अकोला येथील एलआरटी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘शार्क टँक’ स्पर्धेसाठी वाणिज्य (सीए शाखा) शिक्षण घेणाऱ्या बाहेती एज्युकेशन क्लासेसच्या ११ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी ‘चार्ज शेअर’ हे नाविन्यपूर्ण ॲप विकसित केले आहे. या यशस्वी प्रकल्पामध्ये मुक्ताईनगर येथील आर्या मुकेश महल्ले हिचा सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला आहे.

‘चार्ज शेअर’ हे इलेक्ट्रिक वाहनांसाठी (ईव्ही) तयार करण्यात आलेले स्मार्ट चार्जिंग प्लॅटफॉर्म आहे. या ॲपच्या माध्यमातून विविध कंपन्यांच्या चार्जिंग स्टेशनचा वापर एकाच ॲपद्वारे करता येतो. मोबाईल नेटवर्कमधील रोमिंग सुविधेप्रमाणे हे तंत्रज्ञान वेगवेगळ्या चार्जिंग नेटवर्कना एकत्र जोडण्याचे काम करते.

या सुविधेमुळे दुचाकी, चारचाकी तसेच व्यावसायिक वाहनांचे चालक एकाच ॲप किंवा आरएफआयडी कार्डच्या सहाय्याने उपलब्ध असलेल्या कोणत्याही चार्जिंग स्टेशनवर वाहन चार्ज करू शकतात. साधारण ३० ते ४५ मिनिटांत चार्जिंग पूर्ण होते. तसेच सुमारे १२० किलोमीटरच्या परिसरातील उपलब्ध चार्जिंग स्टेशनची माहिती ॲपवर मिळत असल्याने वेळ आणि इंधनाचा अपव्यय टाळण्यास मदत होते.

ईव्ही फ्लीट चालविणाऱ्या कंपन्यांना आतापर्यंत वेगवेगळ्या चार्जिंग नेटवर्कसाठी स्वतंत्र ॲप्स, पेमेंट व्यवस्था आणि बिलिंग व्यवस्थापन करावे लागत होते. ‘चार्ज शेअर’मुळे या सर्व सेवा एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार असल्याने व्यवस्थापन अधिक सुलभ होईल, असा विद्यार्थ्यांचा दावा आहे. यामुळे इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढण्यास आणि पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

‘चार्ज शेअर’ची प्रमुख वैशिष्ट्ये

– एकाच ॲपद्वारे विविध चार्जिंग स्टेशनचा वापर
– एकत्रित बिलिंग व सुलभ पेमेंट प्रणाली
– कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित योग्य चार्जिंग स्टेशनची माहिती
– वेळ आणि खर्चाची बचत
– ईव्ही फ्लीट व्यवस्थापन अधिक सोपे

प्रकल्पात सहभागी विद्यार्थी

आर्या महल्ले, वैष्णवी पाटील, अदिती लड्डा, भूमिका अग्रवाल, वेदिका पोहरे, सई जोरगेकर, हनी वोरा, रुद्र जैन, ओम वाघ, कार्तिक सोनी आणि दक्ष रांडद.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link