धाडसी कारवाईबद्दल मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांचा मानवाधिकार संघटनेकडून सन्मान
उप संपादक | प्रणित काठोके
मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या उल्लेखनीय पोलिसी कारवाईची दखल घेत प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार व महिला नियंत्रण संघटना, मुक्ताईनगर शाखेच्या वतीने त्यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि गौरव प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या विशेष ‘ऑपरेशन ड्रॉप केस’ मोहिमेअंतर्गत मुक्ताईनगर पोलिसांनी तालुक्यातील कुऱ्हा, लालगोटा, हलखेडा, माधापुरी, जोधनखेडा आणि चारठाणा या गावांमध्ये विशेष धाडसत्र आयोजित केले होते.
या कारवाईत मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, सोने-चांदीचे दागिने, शस्त्रे, जिवंत काडतुसे, मोबाईल फोन, चारचाकी व दुचाकी वाहने तसेच वन्यजीवांशी संबंधित साहित्य जप्त करण्यात आले. पोलिसांनी सुमारे ₹58.42 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला असून या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.
या पार्श्वभूमीवर प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार व महिला नियंत्रण संघटनेने त्यांचा विशेष सन्मान केला. कार्यक्रमाला संघटनेचे जिल्हाध्यक्ष मोहन मेढे, जिल्हा संघटक मोतीलाल जोगी, तालुकाध्यक्ष हकीम चौधरी, तालुका सचिव विजय खराटे, तालुका उपाध्यक्ष राजेंद्र वानखेडे, जिल्हा सदस्य बी. डी. गवई, समाधान पाटील, माजी गटविकास अधिकारी राजेशकुमार जैन, सुपडू बोदडे, जगदेव इंगळे, धनंजय सापधरे, सौ. भारती लोखंडे, रविंद्र शिरसोदे, इंद्रायणी भोई, जगन्नाथ चांगदेवकर, दिनेश कोळी, भास्कर कोळी, जे. के. चौधरी तसेच संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.








