एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

वाहतूक नियमांचे पालन करण्याचे शिरूर पोलिसांचे नागरिकांना आवाहन

वाहतूक नियमांचे पालन करण्याचे शिरूर पोलिसांचे नागरिकांना आवाहन

प्रतिनिधी अशोक पाचुंदकर

शिरूर : शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद पाटील यांच्यामार्फत शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व नागरिकांना वाहन चालविताना वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वाहन चालविण्यासाठी प्रत्येक वाहनचालकाकडे वैध वाहन चालविण्याचा परवाना (Driving Licence) असणे आवश्यक आहे. तसेच वाहनाच्या पुढील व मागील बाजूस नियमानुसार नोंदणी क्रमांक (Number Plate) असणे बंधनकारक आहे.
वाहनाची आवश्यक शासकीय कागदपत्रे जसे की नोंदणी प्रमाणपत्र (RC), विमा (Insurance), प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) तसेच इतर आवश्यक कागदपत्रे अद्ययावत ठेवून वाहनासोबत बाळगावीत.
वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन करावे. दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा तसेच चारचाकी वाहनचालकांनी सीटबेल्टचा वापर करावा. वाहनाच्या काचांवर ब्लॅक फिल्मिंग लावू नये.
शिरूर पोलीस स्टेशनकडून वेळोवेळी नाकाबंदी व पेट्रोलिंग दरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येते. या कारवाईदरम्यान नियमांचे पालन करणाऱ्या नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी सर्व वाहनचालकांनी वरील सूचनांचे पालन करावे.
सुरक्षित वाहतूक आणि अपघातमुक्त प्रवासासाठी सर्व नागरिकांनी जबाबदार नागरिक म्हणून सहकार्य करावे, असे आवाहन शिरूर पोलीस स्टेशनतर्फे करण्यात आले आहे.
श्री. विनोद पाटील
पोलीस निरीक्षक
शिरूर पोलीस स्टेशन

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link