एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

श्रेणिक लोढा यांनी हिंगोली पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला, कायदा आणि सुव्यवस्थेला प्रथम प्राधान्य देणार

श्रेणिक लोढा यांनी हिंगोली पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला, कायदा आणि सुव्यवस्थेला प्रथम प्राधान्य देणार!

हिंगोली उप संपादक श्रीहरी अंभोरे पाटील

हिंगोली जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक म्हणून श्रेणिक लोढा यांनी मावळते पोलीस अधीक्षक डॉ. नीलभ रोहन यांच्याकडून बुधवारी हिंगोली पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला. पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा हे 2018 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत ते यापूर्वी खामगांव ( बुलढाणा ) येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते पोलीस खात्यात येण्यापूर्वी मेळघाटच्या आदिवासी भागात वैद्यकीय सेवा केली तर पुण्याच्या ससून रुग्णालयातही त्यांनी सेवा बजावली याव्यतिरिक्त त्यांनी महाराष्ट्रांच्या राज्यपालांचे परिसहाय्यक म्हणूनही काम पाहिले आहे. मावळते पोलीस अधीक्षक डॉ. नीलभ रोहन यांची अवघ्या सहा महिन्यांत नांदेड जिल्ह्यात पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. रोहन यांनी आपल्या कार्यकाळात गुटखा विक्री अवैध वाळू वाहतूक आणि व्यवसायिकांवर कठोर कारवाई करून तसेच गुन्हेगारांना हद्दपार करून थेट बाहेरचा रस्ता दाखवणारे आणि कामात हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवरही त्यांनी कारवाई केली होती. जिल्ह्यात त्यांनी आपली आगळीवेगळी ओळख हिंगोलीकरांना निर्माण करून दिली होती. त्यांच्याकडे आता नांदेड जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. हिंगोली पोलीस अधीक्षक म्हणून श्रेणिक लोढा यांनी पदभार स्वीकारताच अवैध धंदेना थारा दिला जाणार नाही, चुकीला माफी नाही, कायदा आणि सुव्यवस्थेला प्रथम प्राधान्य राहणार असल्याचे स्पष्ट सांगितले आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link