एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

प्रामाणिकतेचे उदाहरण : दहीहंडा पोलिसांची तत्परता

प्रामाणिकतेचे उदाहरण : दहीहंडा पोलिसांची तत्परता

देवरी फाटा येथे विसरलेली सोन्याच्या दागिन्यांची बॅग महिलेला सुखरूप परत

अकोला | प्रतिनिधी : निळकंठ वसू

सांगुळद येथील रहिवासी शारदा प्रभूदास गावंडे या महिला देवरी फाटा येथील सह्याद्री हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी थांबल्या असता त्यांची कॉटन बॅग तेथेच विसरली गेली. काही वेळानंतर बॅग हरवल्याचे लक्षात येताच त्यांनी येवदा ट्रॅफिक कर्मचारी विशाल कवलवकर यांच्याशी संपर्क साधून बॅग हरवल्याची माहिती दिली.
सदर माहिती मिळताच विशाल कवलवकर यांनी तत्काळ दहीहंडा पोलीस ट्रॅफिक कर्मचारी सुधाकर दहिकर यांना याबाबत कळविले. त्यानंतर श्री मानकर कर्मचारी तातडीने देवरी फाटा येथे पोहोचले व विसरलेली बॅग सुरक्षित ताब्यात घेतली. दरम्यान संबंधित महिला देखील घटनास्थळी पोहोचल्या.
बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये अंदाजे दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आढळून आले. यामध्ये –
१२ ग्रॅम सोन्याची पोत
५ ग्रॅम सोन्याचे कानातले
६ ग्रॅम सोन्याचे डोरले
५ ग्रॅम सोन्याचे ॐ पेंडंट
३ ग्रॅम सोन्याची अंगठी
अशा मौल्यवान वस्तूंचा समावेश होता.
बॅगमधील सर्व दागिन्यांची खातरजमा करून ते सुरक्षितपणे शारदा प्रभूदास गावंडे यांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांच्या तत्परतेमुळे महिलेचे मोठे आर्थिक नुकसान टळले.
ही संपूर्ण कार्यवाही दहीहंडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री. गोपाल ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. दहीहंडा पोलिसांच्या प्रामाणिकपणा, कर्तव्यदक्षता आणि तत्परतेबद्दल परिसरातून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
“जनतेची सेवा, हाच आमचा ध्यास”

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link