शिवसेना वर्धापनदिनानिमित्त मांजरेवाडी-मलघेवाडी जिल्हा परिषद शाळेमध्ये स्कुल बॅग व शालेय साहित्य वाटप
प्रतिनिधी हंसराज पाटील
आमदार बाबाजी काळे व जिल्हाप्रमुख रामदास आबा धनवटे यांच्या मार्गदर्शनाखाली खेड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा मांजरेवाडी व मलघेवाडी शाळेतील विद्यार्थांना स्कुल बॅग व शालेय साहीत्य वाटप करण्यात आले.
जिल्हा परिषद शाळा ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे आणि उज्ज्वल भविष्याचे मुख्य केंद्र आहे.
“आपली शाळा, जिल्हा परिषद शाळा” ही केवळ एक घोषणा नसून, ती मराठी संस्कृती, दर्जेदार शिक्षण आणि संस्कार देणारी एक चळवळ आहे.या चळवळीत सहभाग होण्यासाठी शिवसेना परिवार प्रयत्न करत आहे.
शिवसेना विभागप्रमुख राहुल मलघे,युवासेना उपजिल्हाप्रमुख सनी भोर, उद्योजक सुशिल घुले यांच्या सहकार्याने स्कुल बॅग व शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी उदयोजक जयसिंग मांजरे,मा.सरपंच भगवान मांजरे,तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र मांजरे,मा.उपसरपंच गणेश कातोरे,मा.उपसरपंच अजिंक्य मांजरे,मा.उपसरपंच सतिश मलघे,विभागप्रमुख राजु चौधरी,अभिषेक मलघे,अजय मलघे,आयुष मलघे,शाखाप्रमुख समीर मांजरे,विशाल मांजरे,शालेय व्यवस्थापन समिती शाळा
अध्यक्ष कल्पना मांजरे,उपाध्यक्ष – भूषण मांजरे,मुख्याध्यापिका -उज्वला गवळी,सहशिक्षिका सुरेखा आढे आदि उपस्थित होते.








