एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

ओढणीने गळा आवळून विवाहितेचा खून; पतीविरोधात राजगड पोलिसात गुन्हा

ओढणीने गळा आवळून विवाहितेचा खून; पतीविरोधात राजगड पोलिसात गुन्हा

6 महिन्यांपूर्वीच महिला आयोगात तडजोड झाली होती; दीड वर्षाच्या मुलाला पोरके केले

प्रतिनिधी अनिल गवळी
हवेली, 17 जून 2026

पती-पत्नीच्या घरगुती वादातून माहेरी राहणाऱ्या 25 वर्षीय विवाहितेचा ओढणीच्या साहाय्याने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दि. 17 जून 2026 रोजी दुपारी 2:45 च्या सुमारास हवेली तालुक्यातील आर्वी गावात उघडकीस आली. या प्रकरणी मृत महिलेच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून राजगड पोलीस स्टेशनमध्ये पतीविरोधात खून व क्रूरतेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयत *रुतुजा अक्षय तावरे*, वय 25 वर्षे, रा. आर्वी, ता. हवेली, जि. पुणे असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांचा दीड वर्षाचा मुलगा युवराज पोरका झाला आहे. तर आरोपी पती *अक्षय रामदास तावरे*, वय 28 वर्षे, रा. आर्वी, ता. हवेली याच्याविरोधात राजगड पोलीस स्टेशन गु.र.नं. 225/2026, BNS कलम 103, 85 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

*महिला आयोगात तडजोड, पण मारहाण सुरूच*
फिर्यादी अनिकेत दादासो पवार, वय 26 वर्षे, रा. पणदरे, ता. बारामती यांनी दिलेल्या FIR नुसार, रुतुजा हिचे लग्न 16 मे 2023 रोजी अक्षय तावरे याच्याशी झाले होते. लग्नानंतर 6 महिन्यांनीच दोघांत वारंवार वाद सुरू झाले. मारहाणीच्या त्रासाला कंटाळून सुमारे 6 महिन्यांपूर्वी रुतुजा माहेरी पणदरे येथे आली होती.

त्यावेळी तडजोडीसाठी बारामती महिला आयोगाकडे अर्ज करण्यात आला होता. आयोगाच्या सुनावणीत दोन्ही कुटुंबे हजर होती व तडजोड होऊन रुतुजा पुन्हा पतीसोबत राहण्यास गेली होती. मात्र दीड महिन्यानंतर पुन्हा भांडणे सुरू झाल्याने एप्रिल 2026 मध्ये रुतुजा पुन्हा माहेरी आली होती. दि. 4 मे 2026 रोजी भावाने तिला सासवड येथे सोडले असता आरोपीने तिला आर्वीला नेले होते.

*ओढणीने गळा आवळून हत्या*
मंगळवारी दुपारी 2:45 वाजण्याच्या सुमारास शारदानगर, बारामती येथे असलेल्या अनिकेत पवार यांना मामा बजरंग काशिद यांचा फोन आला. राजगड पोलीस स्टेशनचे पो.हवा. गव्हाणे यांनी कळविले की, आरोपी अक्षयने आर्वी येथील राहत्या घरी रुतुजाचा ओढणीच्या साहाय्याने गळा आवळून खून केला आहे. श्लोक हॉस्पिटल येथील डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले आहे.

ही माहिती मिळताच नातेवाईकांनी तातडीने खेड-शिवापूर पोलीस चौकी गाठून लेखी तक्रार दिली. FIR मध्ये नमूद केल्यानुसार, “आरोपी अक्षयने घरगुती भांडणाच्या कारणावरून वारंवार शारीरिक व मानसिक त्रास देऊन ओढणीच्या साहाय्याने गळा आवळून जिवे ठार मारले आहे”.

*FIR दाखल, तपास सुरू*
या प्रकरणाचा तपास हेड कॉन्स्टेबल मयूर महादेव निंबाळकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. सपोनि राठोड तपास अधिकारी असून पो.नि. जाधव हे प्रभारी अधिकारी आहेत. मयतेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून आरोपी अक्षय तावरे याचा शोध सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link