एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाची लोहारा परिसरात जुगार अड्ड्यांवर छापेमारी

पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाची लोहारा परिसरात जुगार अड्ड्यांवर छापेमारी; १२ संशयित ताब्यात, ९.४ लाखांचा मुद्देमाल जप्त.”

धाराशिव प्रतिनिधी :-लाडलेसाब नदाफ

धाराशिव : जिल्ह्यात अवैध व्यवसायांविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत लोहारा परिसरात अवैध जुगार अड्ड्यांवर नियोजनबद्ध कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक रीतु खोखर व मा. अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली परि. पोलीस उपअधीक्षकअमोल मोहिते यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली.परि. पोलीस उपअधीक्षक अमोल मोहिते यांना प्राप्त झालेल्या खात्रीशीर गोपनीय माहितीच्या आधारे लोहारा येथील काणेगाव रोड तसेच माकणी चौक परिसरातील शंभूराजे हार्डवेअर येथे अवैधरित्या सुरू असलेल्या तीन पत्ती (तिरट) जुगार अड्ड्यांवर पथकाने एकाच वेळी छापेमारी केली. या कारवाईमध्ये सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सोमवंशी, सुरेश कासुळे, पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र बहुरे तसेच QRT पथकातील अंमलदार व चालक यांनी सहभाग घेतला. सदर कारवाईत १३ संशयित निष्पन्न झाले असून, त्यापैकी १२ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे, तर १ संशयित फरार आहे. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, १८८७ अन्वये लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संशयितांकडून जुगाराचे साहित्य, मोबाईल फोन, एक चारचाकी वाहन, सहा दुचाकी वाहने व इतर साहित्य एकूण रु. ९,३८,१६०/-किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

धाराशिव जिल्ह्यात अवैध जुगार, मटका, हातभट्टी दारू,अवैध मद्यविक्री, अमली पदार्थांची तस्करी व विक्री तसेच इतर बेकायदेशीर व्यवसायांविरुद्ध पोलीस प्रशासनाकडून सातत्याने प्रभावी कारवाया सुरू असून, अशा कारवाया यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link