एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

शिरूर येथे तरुणाला पाच जणांकडून मारहाण; शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

शिरूर येथे तरुणाला पाच जणांकडून मारहाण; शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

प्रतिनिधी अशोक पाचुंदकर

शिरूर : शिरूर शहरातील वात्सल्य हॉस्पिटल समोर एका तरुणाला पाच जणांनी संगनमताने अडवून हाताने, लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शिरूर पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार, फिर्यादी सतिषकुमार जयप्रकाश सिंग (वय 26 वर्षे, व्यवसाय नोकरी, रा. सुंदरसृष्टी, शिरूर, जि. पुणे, मूळ रा. सोबंता चैरा, बलिया, उत्तर प्रदेश) हे दिनांक 17/06/2026 रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास शिरूर गावच्या हद्दीतील वात्सल्य हॉस्पिटल समोरून घरी जात असताना आरोपी शशिकांत गायकवाड (रा. शिक्रापूर) व इतर चार अनोळखी इसमांनी त्यांना घरी जाण्यापासून रोखले.

“तुझ्या चुकीच्या सांगण्यामुळे मला कंपनीतून कामावरून काढले,” असे म्हणत आरोपींनी संगनमताने हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून दमदाटी केली व गर्दीपासून लांब घेऊन जाऊन फटके देण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 571/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 126(2), 115(2), 189(2), 190, 352, 351(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार जगताप करत असून गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलीस हवालदार मोरे यांनी केली आहे.

शिरूर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक मा. विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

— क्राईम रिपोर्टर अशोक पाचुंदकर

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link