संशय, चित्रपट अभिनेता मंगेशकुमार हिरे यांना ‘साई प्रेरणा गौरव पुरस्कार’ जाहीर
प्रतिनिधी हंसराज पाटील
➖➖➖➖➖➖➖
*प्रसिद्ध सिनेअभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते होणार वितरण*
……………………………….
पुणे – (प्रतिनिधी) – पुणे येथील कलाविष्कार चित्रपट निर्मिती संस्थेचे संस्थापक, कवी, लेखक, निर्माता,दिग्दर्शक व सिने अभिनेता अशा अष्टपैलु कलावंत असलेले मंगेशकुमा हिरे यांना ‘ओम साई विकास प्रतिष्ठान’ आणि ‘बी.बी.सी.फिल्म प्रॉडक्शन’ महाराष्ट्र राज्य निर्मित 2026 चा ‘ *साई प्रेरणा गौरव पुरस्कार’* नुकताच जाहीर करण्यात आला असून, सिनेअभिनेता मंगेशकुमार हिरे यांनी कला व चित्रपट क्षेत्रात केलेले कार्य व दिलेल्या योगदानामुळे या पुरस्कारासाठी त्यांची निवड केल्याचे संयोजकांनी सांगितले. या प्रंसगी, समाजसेवक, साहित्यिक,पत्रकार,
कलावंत आणि उद्योजक उपस्थितीत राहाणार आहेत. या प्रंसगी मराठी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ व सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री *अलकाताई कुबल* (आठल्ये) यांच्या शुभहस्ते साईनगरी शिर्डी येथे हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. या भव्य दिव्य साई प्रेरणा गौरव पुरस्काराचे संस्थापक अध्यक्ष- मा.श्री.सुदाम संसारे.यांनी सांगितले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे सिनेअभिनेत्री.अलका कुबल , माजी जि. प. अध्यक्ष =सौ.शालिनीताई विखे पाटील, उद्योजक. मा.किशोरजी कालडा,जेष्ठ समाज सेविका.सौ.सुमन देसाई ,अध्यात्मिक क्षेत्रातील. मा.दिलीप शेषराव वाघ.याचीप्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभणारआहे. मंगेशकुमार हिरे यांनी आजवर अनेक नाटके,गाणी चित्रपटांचे लिखान केले आहे.त्याचा दिग्दर्शन,निर्मिती व अभिनय केलेला मराठी चित्रपट *संशय* लवकर येत आहे. या चित्रपटात प्रमुख नायक ते आहेत. त्याच्या कार्याचा व लाेकप्रियतेचा विचार करुन मंगेशकुमार हिरे यांना साई प्रेरणा गाैरव पुरस्कार 2016 जाहीर झालेल्या पुरस्काराबद्दल महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मन्यवरांऩी अभिनंदन केले.








