एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

अवैध गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या दोन आरोपींवर शिरूर पोलिसांची कारवाई; तीन गावठी पिस्तूल व चार जिवंत काडतुसे जप्त

अवैध गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या दोन आरोपींवर शिरूर पोलिसांची कारवाई; तीन गावठी पिस्तूल व चार जिवंत काडतुसे जप्त

शिरूर : प्रतिनिधी अशोक पाचुंदकर

शिरूर पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाने धडाकेबाज कारवाई करत अवैध गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या दोन आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याकडून तीन गावठी बनावटीचे पिस्तूल व चार जिवंत काडतुसे असा एकूण १ लाख २४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दिनांक 14/06/2026 रोजी रात्री गस्त घालत असताना पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण व डी.बी. पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, आरोपी विजय उर्फ कोयत्या गोविंद शेंडगे (वय 31 वर्षे, रा. अहमदाबाद, ता. शिरूर, जि. पुणे) हा न्हावरे गावच्या हद्दीत न्हावरे ते तळेगाव ढमढेरे रोडलगत असलेल्या बस स्टॉप परिसरात पिस्तूल बाळगून फिरत आहे.
सदर माहिती पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस अंमलदार नितेश थोरात, विजय शिंदे, निरज पिसाळ, निखिल रावडे, सचिन भोई, अंबादास थोरे, रविंद्र काळे, अजय पाटील, दादाराव नागरे यांच्या पथकाने सापळा रचून आरोपी विजय उर्फ कोयत्या शेंडगे यास ताब्यात घेतले.
आरोपीकडून एक गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे मिळून आली. याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 561/2026, शस्त्र अधिनियम 1959 कलम 3, 25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासादरम्यान आरोपीकडे अधिक चौकशी केली असता त्याने बापू कोंडीबा पारखे (वय 31 वर्षे, रा. सरदवस्ती निमोणे, ता. शिरूर, जि. पुणे) याच्याकडून दोन पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे घेतल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार बापू पारखे याच्याकडून दोन गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता दिनांक 18/06/2026 पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
आरोपी विजय उर्फ कोयत्या शेंडगे याच्यावर यापूर्वी शिरूर व शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीत खून, जबरी चोरी, विनयभंग, मारहाण यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीपसिंग गिल, मा. अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस स्टेशनच्या पथकाने केली.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link