एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

तेर येथील हॉटेल यमुना वर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई; गोवा निर्मित विदेशी मद्याचा साठा जप्त, दोघांना अटक !

  1. तेर येथील हॉटेल यमुना वर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई; गोवा निर्मित विदेशी मद्याचा साठा जप्त, दोघांना अटक !

धाराशिव जिल्हा प्रतिनिधी :-लाडलेसाब नदाफ
५.७९ लाखांचा मुद्देमाल जप्त,

धाराशिव : विधानपरिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेदरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक व विक्रीविरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे. याच मोहिमेअंतर्गत तेर (ता. धाराशिव) येथील हॉटेल यमुना येथे गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याच्या अवैध विक्रीवर धडक कारवाई करण्यात आली.
मा. आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई श्री राजेश देशमुख, विभागीय उपायुक्त श्रीमती संगीता दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क धाराशिव श्री हर्षवर्धन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. पुणे जिल्ह्यात विषारी गावठी दारू प्रकरण घडल्यानंतर धाराशिव जिल्ह्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी विभागाने विशेष दक्षता घेतली आहे.
दिनांक १३ जून २०२६ रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत गोवा राज्यात विक्रीसाठी असलेल्या विविध ब्रँडच्या विदेशी मद्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला. यामध्ये रॉयल स्टॅग, रॉयल चॅलेंज, ओल्ड मंक, इम्पिरियल ब्ल्यू, मॅजिक मोमेंट्स, मॅकडॉवेल्स नं.१, मॅकडॉवेल्स रम, आयकॉनीक व्हाईट आणि ब्लेंडर्स प्राईड आदी ब्रँडच्या एकूण १३४.२५ बल्क लिटर मद्याचा समावेश आहे.याशिवाय गुन्ह्यात वापरण्यात आलेले मारुती सुझुकी सेलेरियो चारचाकी वाहनही जप्त करण्यात आले. मद्यसाठा व वाहनासह एकूण ५ लाख ७९ हजार ६९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ मधील कलम ६५ व इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दादासाहेब दत्तात्रय बारकुल (वय ४१, रा. येरमाळा, ता. कळंब) आणि किशोर गोपाळ नाईकवाडी (वय ३२, रा. तेर, ता. धाराशिव) या दोघांना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई दुय्यम निरीक्षक यू. व्ही. रामगुडे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक एम. पी. कंकाळ तसेच जवान एम. एस. गजधने, व्ही. आय. चव्हाण, एम. आर. पातकळ आणि एस. बी. तुपे यांच्या पथकाने केली. या प्रकरणाची फिर्याद एम. पी. कंकाळ यांनी दिली असून पुढील तपास निरीक्षक आर. एम. बांगर करत आहेत.

दरम्यान, अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक अथवा विक्रीबाबत माहिती असल्यास नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ किंवा व्हॉट्सअॅप क्रमांक ८४२२००११३३ वर माहिती द्यावी, असे आवाहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचेही विभागाने स्पष्ट केले आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link