एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

डॉ. शिवाजीराव शिंदे यांचा मुरूम येथे सेवापूर्ती सत्कार; तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी काम करण्याचा संकल्पमुरूम

डॉ. शिवाजीराव शिंदे यांचा मुरूम येथे सेवापूर्ती सत्कार; तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी काम करण्याचा संकल्पमुरूम

प्रतिनिधी:-लडलेसाब नदाफ

(प्रतिनिधी): भारत सरकारच्या वस्त्र मंत्रालयात प्रादेशिक व्यवस्थापक पदावरून सेवानिवृत्त झालेले डॉ. शिवाजीराव शिंदे यांचा सेवापूर्ती सत्कार व गौरव सोहळा मुरूम शहरातील श्रीराम मंगलकार्यालयात रविवारी उत्साहात पार पडला. स्मृतीशेष सिद्राम गंगाराम शिंदे (गुरुजी) यांच्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त वीरशैव संत कक्कया समाज व मित्रपरिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार ज्ञानराज चौगुले हे होते. व्यासपीठावर प्रा. डॉ. महेश मोटे, राम कांबळे, दत्तू कटकधोंड, शरणाप्पा मुदकण्णा, मनोहर शिंदे, सचिता चव्हाण, मेजर विजयकुमार शिंदे, रुपाली शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. शिवाजीराव शिंदे, त्यांच्या पत्नी रुपाली शिंदे व परिवाराचा मानपत्र, शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. *तात्याराव शिंदे संचालक वीर कंम्प्युटर्स मुरूम यांनीही यावेळी डॉ. शिवाजी शिंदे यांचा सत्कार केला.* या सोहळ्याचे औचित्य साधून डॉ. शिवाजी शिंदे यांच्या वतीने परिसरातील दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आले.समाजसेवेचे कार्य निरंतर सुरू ठेवणार: डॉ. शिवाजी शिंदेसत्काराला उत्तर देताना डॉ. शिवाजी शिंदे भावुक झाले. ते म्हणाले, “वस्त्र मंत्रालयात ३४ वर्षे सेवा बजावून मी सेवानिवृत्त झालो असलो, तरी समाजसेवेचे कार्य यापुढेही अविरत सुरू ठेवणार आहे. शिक्षणाचे महत्त्व मला चांगले ठाऊक आहे. त्यामुळे तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे आणि त्यांना योग्य प्रोत्साहन मिळावे यासाठी माझे कार्य निरंतर राहील,” असा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला.अध्यक्षीय भाषणात माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी डॉ. शिंदे यांच्या राष्ट्रीय स्तरावरील उल्लेखनीय कार्याचा गौरव केला. तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून आपले ध्येय गाठून यश संपादन करावे, असे आवाहन केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वसंत शिंदे, खंडू शिंदे, गिरजप्पा कावळे, धनराज शिंदे, ज्योतीराम शिंदे, प्रवीण शिंदे, श्रावण कटके, सचिन शिंदे, रेवण कटके, बाबू शिंदे, मधुकर शिंदे, जोतीराम रकमाजी शिंदे, राजेंद्र कटके, वैभव कटके, अमोल कटके, तात्याराव शिंदे, सुलोचना शिंदे, जयश्री कावळे, महादेवी शिंदे, रेशमा शिंदे व साक्षी शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कमलाकर मोटे यांनी केले, सूत्रसंचालन संतोष पवार यांनी केले, तर गंगाधर शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link