एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

अण्णा हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त राळेगणसिद्धी येथे सदिच्छा भेट व आरोग्य शिबिराचे आयोजन

अण्णा हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त राळेगणसिद्धी येथे सदिच्छा भेट व आरोग्य शिबिराचे आयोजन
रविवार दिनांक १४/०६/२०२६

राळेगणसिद्धी : प्रतिनिधी अशोक पाचुंदकर

युवा क्रांती पोलीस मित्र संघटना शिरूर तालुका आयोजक तथा राष्ट्रीय सहसंघटक माननीय सुरेश आप्पा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ समाजसेवक माननीय अण्णा हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेटीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी राळेगणसिद्धीचे आदर्श सरपंच माननीय अमोल शेठ मापारी यांनी कार्यक्रमाचे योग्य नियोजन करून आरोग्य शिबिर, सर्व रोग निदान शिबिर तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन केले. स्वतः सरपंच अमोल शेठ मापारी यांनी रक्तदान करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या प्रसंगी छायाताई नवले, कल्पनाताई पुंडे, मंदा भाकरे (शिरूर तालुका सदस्य पोलीस मित्र), रंजना बोरगे (पारनेर तालुका सदस्य पोलीस मित्र), संदीप भाकरे, विलास रोहिले तसेच अशोक पाचुंदकर उपस्थित होते.
वरील सर्व युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेचे पदाधिकारी, अधिकारी व सदस्य यांनी अण्णा हजारे यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या.
अण्णा हजारे यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त केंद्र सरकारच्या वतीने अण्णांना रणगाडा सप्रेम भेट देण्यात आला.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख संदीप शेठ भाकरे यांनी रक्तदान करून अण्णांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन राळेगणसिद्धीचे आदर्श सरपंच अमोल शेठ मापारी यांनी उत्तम प्रकारे पार पाडले.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link