एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

पालघर वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शैक्षणिक वह्यांचे वाटप..

पालघर वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शैक्षणिक वह्यांचे वाटप..

प्रतिनिधी पालघर

पालघर, दि. १३ जून : महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना आणि जनकल्याण चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पालघर वाहतूक शाखेतील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक वह्या वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला पालघर वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी व्हटकर साहेब यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रेरणादायी सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अशा सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन देणाऱ्या व्हटकर साहेबांचे आयोजकांनी आभार व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी उपस्थित पदाधिकारी
अमोल गायकवाड साहेब, किरण पाटील साहेब तसेच पालघर वाहतूक शाखेतील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम अधिक अर्थपूर्ण व प्रेरणादायी ठरल्याचे आयोजकांनी सांगितले.
पोलीस बांधव आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना व जनकल्याण चॅरिटेबल ट्रस्ट यापुढेही विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
या उपक्रमाचे आयोजन महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना पालघर जिल्ह्याचे जिल्हा महासचिव तथा जनकल्याण चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष मंगेश उईके यांच्या पुढाकारातून करण्यात आले.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link