एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

शिंदवणे ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल; आरक्षण सोडतीत महिलांचे व विविध प्रवर्गांचे वर्चस्व

शिंदवणे ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल; आरक्षण सोडतीत महिलांचे व विविध प्रवर्गांचे वर्चस्व!
तेरा जागांसाठी आरक्षण जाहीर; गावातील राजकीय समीकरणांना वेग
उपसंपादक: गणेश महाडिक
हवेली तालुक्यातील शिंदवणे ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीसाठी तेरा सदस्य पदांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम शुक्रवारी मोठ्या उत्साहात आणि पारदर्शक वातावरणात पार पडला. ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या या सोडतीकडे गावातील राजकीय नेते, इच्छुक उमेदवार आणि नागरिकांचे विशेष लक्ष लागले होते.
कृषी अधिकारी तथा पंचायत समिती हवेलीचे अधिकारी सुनील रूपनर यांच्या अध्यक्षतेखाली ही आरक्षण सोडत पार पडली. यावेळी ग्राममहसूल अधिकारी आनंद ढगे ग्रामविकास अधिकारी राजेंद्र जगताप, प्रशासक सरपंच सौ. प्रमिलाताई कचरु शितोळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
सोडतीनंतर अनेक प्रभागांमध्ये महिला आरक्षण लागू झाल्याने ग्रामपंचायत निवडणुकीच्या राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे. गावातील अनेक इच्छुकांना आपली रणनीती बदलावी लागणार असून नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यावेळी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष व माजी सरपंच गणेश भाऊसाहेब महाडिक, माजी अध्यक्ष भुजंग बापू महाडिक, सोसायटीचे अध्यक्ष सचिन महाडिक, ग्रामपंचायत सदस्य सचिन शिंदे, शिवाजी महाडिक, अंकुश महाडिक, गणेश महाडिक, संकेत नलावडे दत्तात्रय महाडिक सावळे, सोहम साबळे, कचरू शितोळे, प्रदीप देशमुख, मदन कांबळे, शेखर शिरवाळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
📌 आरक्षणाचा तपशील :
▪️ प्रभाग क्र. १ – सर्वसाधारण महिला (१), सर्वसाधारण (२)
▪️ प्रभाग क्र. २ – OBC महिला (१), सर्वसाधारण महिला (१), सर्वसाधारण (१)
▪️ प्रभाग क्र. ३ – SC महिला (१), OBC महिला (१), सर्वसाधारण (१)
▪️ प्रभाग क्र. ४ – सर्वसाधारण महिला (१), सर्वसाधारण (१)
▪️ प्रभाग क्र. ५ – OBC पुरुष (१), सर्वसाधारण महिला (१)
आरक्षण सोडत जाहीर होताच गावात निवडणुकीच्या चर्चांना उधाण आले असून विविध राजकीय गटांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अनेक नवीन चेहरे निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत असून आगामी काळात ग्रामपंचायत निवडणूक अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link