विधीसंघर्षग्रस्त बालकाडुन ३ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस
२ दुचाकी चाकी वाहने व १ तीन चाकी रिक्षा जप्त
भारती विद्यापीठ पोलीसांची धडाकेबाज कामगिरी
प्रतिनिधी कांताभाऊ राठोड
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत वाहन चोरीचे प्रमाण वाढल्यामुळे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे, अभिनय चौधरी हे वाहन चोरांचा शोध घेत असताना त्यांना एक विधीसंघषर्षीत बालक वंडरसिटी रोडवरील मोकळया जागेमध्ये चोरीची रिक्षा व दुचाकी गाडी पार्क करुन थांबला आहे अशी खात्रीशीर माहीती मिळाली.
त्याप्रमाणे नमुद पोलीस अधिकारी व अंमलदार हे वंडरसिटी रोडकडुन सावंत विहारकडे जाणाऱ्या रोडवर गेले असता तेथे एक विधीसंघर्षात बालक हा एक रिक्षा गाडी क्रमांक MH12.QR.3784 व दुचाकी डिओ गाडी क्रमांक MH12QQ7182 या दोन वाहनांसह मिळुन आल्याने, त्या वाहनांबाबत त्याचेकडे तपास करता त्याने त्याचे साथीदारांसह सदरची वाहने चोरी केल्याचे निष्पन्न झाले असुन, सदरची वाहने जप्त करण्यात आली आहेत. नमुद विधीसंघर्षात बालकाकडे केले तपासामध्ये त्याने त्याचे दोन साथीदारांसह आणखीन होंडा शाईन दुचाकी गाडी क्रमांक MH12KZ6111 ही दुचाकी गाडी चोरी केल्याचे सांगितले आहे.
नमुद विधीसंघर्षीत बालकाकडून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील खालील प्रमाणे वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
अ.क्र
गुरनं ३१८/२०२६
कलम
३१९/२०२६,
भारतीय न्याय संहीता कलम ३०३(२)
४७४/२०२५
भारतीय न्याय संहीता कलम ३०३(२)
भारतीय न्याय संहीता कलम ३०३(२)
जप्त वाहन तीन चाकी रिक्षा MH12.QR.3784 डिओ दुचाकी वाहन
किंमत
MH12QQ7182 शाईन दुचाकी वाहन
१,००,०,०००/-
६५,०००/-
७०,०००/-
एकुण २,३५,०००/- रुपयांची तीन वाहने जप्त करण्यात आली आहे
MH12KZ6111
सदरची कामगिरी मिलींद मोहीते, पोलीस उप आयुक्त परिमंडळ, पुणे शहर, राहुल आवारे, सहाय्यक पोलीस आयुक्त भारती विद्यापीठ विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कैलास कोडग, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, सचिन सरपाले, अवधुत जमदाडे, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार, संदीप आगळे यांच्या पथकाने केली आहे.








