एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

जामनेरमध्ये बनावट कापूस बियाणे विक्री रॅकेटचा पर्दाफाश; 9.15 लाखांचा मुद्देमाल जप्त

जामनेरमध्ये बनावट कापूस बियाणे विक्री रॅकेटचा पर्दाफाश; 9.15 लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगाव उपसंपादक | प्रणित काठोके

15
जामनेर : जामनेर तालुक्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करून बनावट व अनधिकृत कापूस बियाण्यांची विक्री करणाऱ्या रॅकेटचा जळगाव पोलिसांनी पर्दाफाश केला असून, या कारवाईत तब्बल ₹9 लाख 15 हजार 416 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी चार जणांविरुद्ध विविध कायद्यांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई प्रोबेशनरी उपविभागीय पोलीस अधिकारी (DySP) प्रशांत दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या प्रकरणात कृषी विकास अधिकारी, पंचायत समिती जामनेर यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांना जामनेर शहरातील साईनगर परिसरात राहणाऱ्या दीपक राजमल चौधरी यांच्या राहत्या घरातून अनधिकृतपणे कापूस बियाण्यांचा साठा करून त्याची विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला असता मोठ्या प्रमाणात कापूस बियाण्यांचा साठा आढळून आला.
कारवाईदरम्यान पोलिसांनी 40 गोण्या व 1,016 बियाण्यांची पॅकेट्स जप्त केली. या पॅकेट्सवर विविध कंपन्यांची नावे आणि बॅच क्रमांक नमूद करण्यात आले होते.
तपासणीदरम्यान संबंधित व्यक्तीकडे बियाणे विक्रीसाठी आवश्यक असलेला वैध परवाना, साठा परवाना तसेच विक्रीसंदर्भातील आवश्यक कागदपत्रे नसल्याचे उघड झाले. तसेच जप्त करण्यात आलेल्या बियाण्यांच्या खरेदी-विक्रीबाबत कोणतेही समाधानकारक पुरावे सादर करण्यात आले नाहीत.
जप्त बियाण्यांचा तपशील
Diya-59 (KDCHH 02 BG II) – 250 पॅकेट्स
Diya-59 (KDCHH 02 BG II) – 200 पॅकेट्स
Krish-45 (KDCHH 065 BG II) – 566 पॅकेट्स
जप्त करण्यात आलेल्या सर्व बियाण्यांची एकत्रित किंमत ₹9,15,416 इतकी असल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे.
प्राथमिक तपासात संबंधित बियाणे उत्पादक कंपनीची अधिकृत परवानगी व विक्री व्यवस्था न घेता ही बियाणे बाजारात विक्रीसाठी आणल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. कृषी विभागाने यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होण्याची तसेच निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांमुळे उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणी खालील व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे :
दीपक राजमल चौधरी, साईनगर, जामनेर
गुलाब आधार पाटील, वर्दी, ता. पाचोरा
शेषराव पाटील, वर्दी, ता. पाचोरा
इतर संबंधित व्यक्ती
या प्रकरणात भारतीय न्याय संहिता (BNS) 2023, बियाणे अधिनियम 1966, बियाणे नियंत्रण आदेश 1983, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 तसेच इतर संबंधित कायद्यांतील तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link