आज दिनांक ०५/०६/२०२६ रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पालघर पोलीस दल व ब्लिस जी.व्ही.एस. फार्मा लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस अधीक्षक कार्यालय, पालघर येथे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला
प्रतिनिधी रणजीत मस्के
याप्रसंगी उपस्थित सर्वांनी पर्यावरण संवर्धनाची शपथ घेतली तसेच कार्यालय परिसरात ३०० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
सदर वेळी श्री. यतिश देशमुख, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. रविंद्र नाईक, पोलीस उप अधीक्षक (गृह), पालघर तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार व ब्लिस जी.व्ही.एस.फार्मा लिमिटेड यांचेकडील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.








