पुण्याच्या पोलीस आयुक्तांची तातडीने बदली करा:- खासदार सुप्रिया सुळें सरकारवर भडकल्या
( पुणे जिल्हा ) संभाजी पुरीगोसावी प्रतिनिधी.
पुणे शहरांतील पोलीस आयुक्त अमितेशकुमार हे पुणे शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अपयशी दिसून आले आहे. पोलीस आयुक्तांच्या कारभारांवर थेट खासदार सुप्रिया सुळेंनी चांगलाच प्रश्नचिन्ह निर्माण करत त्यांची तातडीने बदली करावी असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला संदेश दिला आहे. नवा कार्यक्षम अधिकाऱ्याची पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करावी. पुण्यातील वाढती गुन्हेगारी आणि विषारी दारूच्या समस्येवर बोलताना फक्त अधिकाऱ्यांच्या बदल्या करून किंवा निलंबन करून प्रश्न सुटणार नाही, असा थेट इशारा खासदार सुप्रिया सुळे सरकारवर चांगल्याच भडकल्या गेल्या आहेत. वाढत्या गुन्हेगारीसाठी त्यांनी गृह विभाग आणि पोलीस आयुक्तांच्या कारभारांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. विशेष म्हणजे पोलीस आयुक्तांची तातडीने बदली करा असे त्या म्हणाले आहेत. पुणे शहर हे गुन्हेगारीच्या बाबतीत देशात पाचव्या आणि राज्यांत पहिल्या क्रमांकावर गेला आहे. पुणे व पिंपरी चिंचवड मध्ये विषारी दारूमुळे झालेल्या नागरिकांच्या मृत्यूवर त्यांनी तीव्र संताप व्यक्त करत अवैध धंदे सरसपणे सुरू असताना पोलीस आयुक्तांनी गृह खातं काय करत आहे. असाही सवाल त्यांनी विचारला आहे. तसेच मला पुण्याच्या कायदा व सुव्यवस्थेवरील इतर नेत्यांच्याही प्रतिक्रिया हव्या आहेत.*








