एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

मुक्ताईनगरात खुल्या खाद्यतेल विक्रीवर कारवाई; ५७ हजार रुपयांचे सोयाबीन तेल जप्त

मुक्ताईनगरात खुल्या खाद्यतेल विक्रीवर कारवाई; ५७ हजार रुपयांचे सोयाबीन तेल जप्त

जळगाव उप संपादक | प्रणित काठोके

मुक्ताईनगर : अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन करून खुल्या स्वरूपात खाद्यतेलाची विक्री करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करत ५७ हजार २८० रुपये किमतीचे रिफाइन्ड सोयाबीन तेल जप्त केले.

मुक्ताईनगर तालुक्यातील बोदवड रोड परिसरात खुल्या स्वरूपात रिफाइन्ड सोयाबीन तेलाची विक्री होत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार तपासणी करण्यात आली असता, अन्न सुरक्षा मानकांनुसार आवश्यक पॅकिंग न करता खाद्यतेल विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे आढळून आले.

प्रशासनाने नमुना तपासणीसाठी घेतला असून ३५८ किलो खाद्यतेलाचा साठा जप्त केला आहे. जप्त साठ्याची किंमत ५७ हजार २८० रुपये आहे. या प्रकरणात उत्पादकापर्यंत चौकशी सुरू असून संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

ग्राहकांनी केवळ पॅकबंद खाद्यतेलाची खरेदी करावी आणि कोणत्याही प्रकारचे खुल्या स्वरूपातील खाद्यतेल खरेदी टाळावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link