एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

ब्लॅक बगीरा’ शीतपेयाच्या १.४४ लाख रुपयांच्या साठ्यावर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

ब्लॅक बगीरा’ शीतपेयाच्या १.४४ लाख रुपयांच्या साठ्यावर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

जळगाव उप संपादक | प्रणित काठोके

जळगाव : अन्न व औषध प्रशासनाने एमआयडीसी परिसरातील एका शीतपेय विक्रेता व वितरकावर कारवाई करत ‘ब्लॅक बगीरा’ (Black Bagiraa) या कॅफिनयुक्त कार्बोनेटेड शीतपेयाचा १ लाख ४४ हजार ८०० रुपयांचा साठा जप्त केला आहे.

तपासणीदरम्यान संबंधित शीतपेयाच्या लेबलिंगमध्ये त्रुटी आढळून आल्या. तसेच उत्पादन मानकांनुसार नसल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यामुळे शीतपेयाचा नमुना प्रयोगशाळा विश्लेषणासाठी घेण्यात आला.

यावेळी २०० मिली क्षमतेच्या ७ हजार ४४० बाटल्यांचा साठा जप्त करण्यात आला. जप्त साठ्याची किंमत १ लाख ४४ हजार ८०० रुपये आहे.

या प्रकरणी पुढील पुरवठादार व उत्पादकांविरोधात कारवाई करण्यासाठी संबंधित कार्यक्षेत्रातील अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच संबंधित उत्पादनाचा साठा बाजारातून परत मागविण्याबाबत उत्पादकास नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link