एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

लोहटार येथे लस्सीच्या २२ हजार रुपयांच्या साठ्यावर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

लोहटार येथे लस्सीच्या २२ हजार रुपयांच्या साठ्यावर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

जळगाव उप संपादक | प्रणित काठोके

पाचोरा : अन्न सुरक्षा मानके कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या अन्न व्यावसायिकांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई करत लोहटार (ता. पाचोरा) येथील एका उत्पादक पेढीवर छापा टाकला. या कारवाईत २२ हजार ५०० रुपये किमतीचा लस्सीचा साठा जप्त करण्यात आला.

अन्न व औषध प्रशासनाला प्राप्त झालेल्या माहितीनुसार, भडगाव रोडवरील बांबरुळ फाटा परिसरातील उत्पादक पेढीची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान लस्सीच्या पॅकेटवर उत्पादन दिनांक व समूह क्रमांक नमूद नसल्याचे निदर्शनास आले. तसेच उत्पादनामध्ये भेसळीचा संशय असल्याने लस्सीचा नमुना प्रयोगशाळा विश्लेषणासाठी घेण्यात आला.

यावेळी २०० मिली क्षमतेची ७५० लस्सी पॅकेट्स जप्त करण्यात आली. जप्त साठ्याची किंमत २२ हजार ५०० रुपये असल्याचे प्रशासनाने सांगितले. नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link