एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

दहीहंडा पोलिसांची अवैध दारूविरोधी धडक कारवाई; एका दिवसात ५ गुन्हे दाखल

दहीहंडा पोलिसांची अवैध दारूविरोधी धडक कारवाई; एका दिवसात ५ गुन्हे दाखल

अकोला | प्रतिनिधी
निळकंठ वसू

पोलीस स्टेशन दहीहंडा हद्दीत दिनांक 21 मे 2026 रोजी अवैध दारू विक्रीविरोधात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत पोलिसांनी धडक कारवाई करत एकूण ५ गुन्हे दाखल केले. या कारवाईत ₹21,010 किमतीचा देशी दारूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कारवाईचा तपशील पुढीलप्रमाणे :
ग्राम किणखेड पूर्णा, ऑटो बस स्टँड परिसर
जप्त मुद्देमाल : देशी दारू
किंमत : ₹4,000
आलेवाडी फाटा, शेगाव रोड
जप्त मुद्देमाल : देशी दारू
किंमत : ₹3,060
जुना जिम चौहट्टा बाजार परिसर
जप्त मुद्देमाल : देशी संत्रा दारू
किंमत : ₹6,000
ग्राम तरोडा, आरोपीच्या राहत्या घरामागे
जप्त मुद्देमाल : देशी दारू
किंमत : ₹3,900
ग्रामपाटी फाट्यापासून दोनवाडा गावाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर
जप्त मुद्देमाल : देशी दारू
किंमत : ₹4,050
या सर्व कारवायांमध्ये एकूण ५ गुन्हे दाखल करून ₹21,010 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दहीहंडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोपाल ढोले यांच्या नेतृत्वाखाली अवैध दारू विक्रीविरोधात सुरू असलेल्या कारवायांना वेग आला असून, पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणारी प्रहार मोहीम प्रभावीपणे सुरू असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी अवैध व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा धडाका कायम ठेवण्याचा इशारा दिला आहे.
अवैध दारू विक्री व वाहतुकीवर अंकुश ठेवण्यासाठी दहीहंडा पोलिसांकडून पुढील काळातही विशेष मोहिमा राबविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link