एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

पुणे विषारी दारू प्रकरण : विषारी रासायनिक पदार्थ पुरवठा करणारे दोन आरोपी अटकेत

पुणे विषारी दारू प्रकरण : विषारी रासायनिक पदार्थ पुरवठा करणारे दोन आरोपी अटकेत
पुणे, प्रतिनिधी : दापोडी व हडपसर परिसरातील विषारी हातभट्टी दारू प्रकरणात महत्त्वाची कारवाई करत गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पुणे पथकाने हातभट्टी दारूमध्ये विषारी रासायनिक पदार्थ मिसळण्यासाठी पुरवठा करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे.
दिनांक २६ मे ते २८ मे २०२६ या कालावधीत दापोडी व हडपसर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विषारी हातभट्टीची दारू सेवन केल्याने काही नागरिकांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी दापोडी पोलीस ठाणे व हडपसर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच मुंबई दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तपासादरम्यान हातभट्टीच्या दारूमध्ये विषारी रासायनिक पदार्थ मिसळून त्याचा पुरवठा करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. पुराव्यांची साखळी उभी करून सीआयडीने अरुण जगदेव चौबे (वय ५९) व अभिषेक अरुण चौबे (वय ३४, रा. वाशीगाव, नवी मुंबई) यांना ताब्यात घेऊन अटक केली. आरोपींना पिंपरी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
या दुर्दैवी घटनेत दापोडी परिसरात १६ तर हडपसर परिसरात ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.
तपास पथकाने विविध घटनास्थळांवरील सीसीटीव्ही फुटेज, नमुने व इतर महत्त्वाचे पुरावे जप्त केले असून ते न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळा (एफएसएल), पुणे येथे विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत.
ही कारवाई अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद, विशेष पोलीस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ, पुणे पथकाच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सचिन चव्हाण व त्यांच्या पथकाने केली.
या गुन्ह्याबाबत अधिक माहिती असल्यास नागरिकांनी तपास अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडून करण्यात आले आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link