मुंब्रा पोलीस स्टेशन हददीतील दिवा परिसरातुन ०७ वर्षाच्या अपहरीत मुलीचा ०२ दिवस सतत दिवसरात्र सुमारे ९४८ CCTV फुटेज तपासुन अपहरणाच्या क्लिष्ट गुन्हयाची केली उकल.”
अजिंक्य महाराष्ट्र न्यूज रणजीत मस्के
मुंब्रा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ९१२/२०२६ भा.व्या. सहिता १३७ (२) प्रमाणे दिनांक 29/05/2026 रोजी दाखल झाला असून सदर गुन्ह्यात अपहरित मुलगी नामे साक्षी विजयकुमार पांडे, वय 07 वर्ष 22 दिवस ही दिनांक 28/05/2026 रोजी रात्री 20:30 वाजताचे सुमारास तीचे दिवा येथील राहते घराच्या बिल्डिंग परिसरातून कोणास काहीही न सांगता निघून गेलेली आहे. अशी तक्रार तिचे वडील विजयकुमार पांडे यांनी दिल्याने सदरचा गुन्हा तात्काळ WPSI अनु शर्मा यांच्याकडे तपास कामी देण्यात आला होता.
सदर गुन्हयाची माहिती मिळताच वपोनि/अनिल शिंदे व ACP प्रिया डमाळे मॅडम यांनी सदर अपहरीत मुलीच्या राहते घरी भेट देऊन, अपहरित मुलीचा शोध घेणे संदर्भात वपोनि यांनी अधिकारी व अंमलदार यांना सूचना दिल्या. तसेच सदर मुलीचा शोध घेण्याकरिता तात्काळ ०४ डीबी टीम, ०२ NDPS टीम बनवुन हददीत तात्काळ खाना केले.
मा. वरिष्ठांच्या आदेशा प्रमाणे नेमण्यात आलेल्या पथकातील अधिकारी व अंमलदार हे परिसरातील सर्व बिल्डींगला लिफ्ट नसतांना पायऱ्या चढुन टेरेस आणि परिसरातील सर्व रिकाम्या रूम सर्व चेक केले तसेच परिसरातील सर्व गटारी, चेंबर उतरुन तपासले असले. पोलीस आयुक्तालय, ठाणे अंतर्गत सर्व पोलीस ठाणे तसेच सर्व रेल्वे पोलीस ठाणे, सेल्टर हाऊस, चाईल्ड प्रोटेक्शन युनिट, दिवा येथील पोलीस मित्र ग्रुप, तसेच दिवा येथील सर्व सामाजिक, राजकीय ग्रुप, मीडिया ग्रुप यांना सदरची मुलीचा फोटो प्रसारीत करुन शोध घेणे संदर्भात माहिती व सुचना देण्यात आल्या होत्या.
दिनांक 29/05/206 रोजी अपहरित मुलगी राहत असलेल्या परिसरातील एस. एम. पी बिल्डिंगचे CCTV कॅमेरा मधून सदर मुलगी दि.28/05/2026 रोजी धनलक्ष्मी अपार्टमेंट येथे जातांना दिसत होती, तसेच धनलक्ष्मी अपार्टमेंट चे CCTV कॅमेरे मधून पुढे श्लोक नगर परिसरात जातांना दिसत होती. पुढे कुंदन अपार्टमेंट, आरव अपार्टमेंट, मनस्वी अपार्टमेंट, साई पॅराडाईज, सिंबोसिस शाळा, श्लोक नगर, मुंब्रा देवी कॉलनी, दातीवली रोड तसेच इ. इमारतींमधील ६७CCTV कॅमेरे बारकाईने तपासले केले असता सदर अपहरीत मुलगी विठ्ठल रुक्मिणी मंदिर जवळील मेडिकल दातिवली रोड या ठिकाणी दिसून आली होती.
दिनांक 30/05/2026 रोजी दिवा आगासन रोडवरील 28/05/2026 रोजीचे CCTV फुटेज तपासुन पाहिले असता सदर मुलगी दिवा आगासन रोडने छत्रपती शिवाजी महाराज चौक दिवा या ठिकाणी जातांना दिसत होती, तद्नंतर ती दिवा रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक 01 येथे एका अनोळखी इसमाबरोबर बोलतांना दिसत होती. त्यानंतर दोघेही प्लॅटफॉर्म क्रमांक 01 वरील 22:57 अंबरनाथ लोकल डबा क्रमांक 5345 मध्ये चढतांना दिसत होते.
सदरची माहिती मिळतात वपोनि/अनिल शिंदे यांनी सर्व टिमला सर्व रेल्वे स्टेशनचे CCTV फुटेज तपासणी करीता जाण्याचे आदेश दिले. त्यानंतर सदरची अपहरित मुलीचा शोध घेणेकामी नेमलेल्या 06 टीम कोपर स्टेशन, डोंबिवली स्टेशन, ठाकुर्ली स्टेशन, कल्याण स्टेशन, विठ्ठलवाडी स्टेशन, उल्हासनगर स्टेशन, अंबरनाथ रेल्वे स्टेशन या विविध ठिकाणी रवाना केल्या होत्या. सदर अपहरित मुलगी व अनोळखी इसम 28/05/2026 रोजी 23:57 वा. CCTV फुटेज मध्ये अंबरनाथ रेल्वे स्टेशन येथे उतरतांना दिसत होते. तद्नंतर दोघेही बदलापूर ट्रेन मध्ये चढले व 00:17 वा. बदलापूर स्टेशनला उतरतांना दिसले.
दिनांक 31/05/2026 रोजी रात्री 01:30 वाजता सर्व 06 टीम यांनी बदलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील सर्व कॅमेरे व बदलापूर शहरातील कॅमेरे तसेच रिक्षावाले, स्थानिक रहिवासी, स्थानिक पोलीस यांना सदर अनोळखी इसम याचा व अपहरित मुलीचा फोटो दाखवुन त्यांचे बाबत चौकशी केली असता सदर अनोळखी इसमाचे नाव सुमित शांताराम जाधव, वय 35 वर्ष असल्याचे माहिती समजली. काहीवेळात त्याचे राहते घरी पोलीस गेले असता सदर अपहरीत मुलगी व संशयीत इसम याचे 03 अल्पवयीन मूल (दोन मुले एक मुलगी वय 04 ते 09 वर्ष) हे त्यांचे राहते घरात मिळून तो व त्याची पत्नी मागील दीड वर्षापासून वेगळे राहत आहे. त्याची पत्नी आणि त्याच्यामध्ये ती जॉब सोडणार नाही आणि मुलांची देखभाल करणार नाही मुलांना होस्टेलला टाकण्यावरून वाद आहेत आणि त्याचे म्हणणे आहे की, मुलांचे संगोपन आपण स्वतः ही करायला पाहिजे म्हणून तो स्वतः विभक्त राहत आहे तरी सदर इसमाच्या मुलीच्या बाबतीत खडकपाडा पोलीस स्टेशन कल्याण येथे पोक्सो कायदया अंतर्गत गुन्हा दाखल असुन आपल्या मुली सोबत झालेल्या गैरकृत्या सारखे कृत्यया मुली सोबत होवु नये या काळजी पोटी सदर मुलीला तो आपले राहते घरी बदलापुर येथे घेवुन जावुन आपल्या मुलासोबत या मुलीची देखील व्यवस्थीत देखभाल करत होता. सदरचा व्यक्ती नामे सुमित शांताराम जाधव हे नम्र स्वभावाचे आणि चांगल्या आचरणाचे आहेत.
सदर अपहरीत मुलगी नामे साक्षी हिस महिला पोलीस अधिकारी यांनी विश्वासात घेऊन तीच्याकडे चर्चा केली असता असे निदर्शनास आले की, तीचे आई वडील तिला घरातील कामे जास्त सांगायचे तसेच लहान बहिणीला दिवसभर कडेवर घेऊन फिरण्यास सांगायचे घरातील कामे पण कारण सांगायचे ती थोडी खेळकर स्वभावाची असून तिला खेळायला वेळ देत नव्हते आणि तीला मारहाणपण सतत होत असे अशी माहिती साक्षी हिने दिली आहे.
तसेच तीच्या आजूबाजूच्या लोकांकडे पण चौकशी केली होती त्यांनी देखीलतीच माहिती सांगितली आहे. साक्षीचे आई-वडिलांचा तीला भरपूर त्रास होता आणि आई-वडील अशिक्षित असल्यामुळे त्यांच्या सततच्या त्रासाला कंटाळून ती घरातून कोणास काहीएक न सांगता निघून गेली होती. सदर अपहरित मुलीचा शोध घेणे करीता नेमण्यात आलेल्या एकुण ०६ टिमचे सर्व अधिकारी व अंमलदार यांनी सतत ०२ दिवस दिवसा व रात्रौ तपासादरम्यान सुमारे 948 सीसीटीव्हीची फुटेजची तपासुन अपहरीत मुलीचा शोध घेतला आहे.
सदर तपासात मा. पोलीस आयुक्त सो, ठाणे शहर, मा. सह पोलीस आयुक्त, ठाणे शहर, मा. अप्पर पोलीस आयुक्त, प.प्रा.वि.ठाणे., मा. बाळासाहेब पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-०१, ठाणे, मा. प्रिया डमाळे मॅडम, सहा. पोलीस आयुक्त, कळवा विभाग, ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि/अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक/शरद कुंभार (गुन्हे), पोलीस निरीक्षक/नितीन पगार, सपोनि/वसंत खतेले, सपोनि/अमोल कोळेकर, सपोनि/विनायक माने, सपोनि/रोहित केदार, सपोनि/गणेश जाधव, सपोनि/तेजस सावंत, मपोउपनि/अनु शर्मा व इतर ४५ पोलीस अंमलदार यांनी दिवस रात्रौ मेहनत करुन जेवणाची आणि झोपण्याची चिंता न करता अथक परिश्रम घेवुन सदर अपहरित मुलगी नामे साक्षी पांडे हिचा यशस्वीरित्या शोध घेवुन अपहरणाचा क्लिष्ट गुन्हा कोणताही पुरवा उपलब्ध नसतांना ०२ दिवसांत उघडकीस आणला आहे. तरी सदर गुन्हया पुढील तपास चालू आहे….








