एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

पत्नीची छेड काढल्याच्या रागातुन मित्राचा खुन करणा-या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने 48 तासात केले जेरबंद

पत्नीची छेड काढल्याच्या रागातुन मित्राचा खुन करणा-या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने 48 तासात केले जेरबंद.

(छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीसांची कारवाई)

रणजीत मस्के

दिनांक 25/05/2026 रोजी कच्ची घाटी येथे एक अज्ञात 25 ते 27 वर्षे वयाचे इसमांचे प्रेत मिळाल्यावरुन पोलीस ठाणे चिकलठाणा येथे अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली होती. सदर बातमीच्या अनुषंगाने मा. पोलीस अधिक्षक, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण श्री. प्रकाश भा. जाधव व मा.अपर पोलीस अधिक्षक श्री. प्रशांत स्वामी यांनी स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विजसिंह राजपूत व पोस्टे चिकलठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र बनसोडे यांना नमूद गुन्हा उघडकीस आणणेबाबत मार्गदर्शन करून सुचना दिल्या.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपुत यांनी तात्काळ स्था.गु.शा. पथकासह घटणास्थळाची, प्रेताची व परीसराची पाहणी केली सुरवातीस प्रेताची ओळख पटविणे क्लिष्ठ होते परंतु स्था.गु.शा. पथकाने आजु बाजुस गावात शेतवस्तीवर गुप्त बातमीदार नेमूण व बारकाईने तपास चालु ठेवला. तसेच वेगवेगळ्या ठिकाणचे सी.सी.टि.व्हि फुटेज पाहणी केली.

सदर घटणेच्या अनुषंगाने जिल्हा बीड, जालना, बुलढाणा, नाशीक, छत्रपती संभाजीनगर शहर येथील नजीकच्या दाखल झालेल्या मिसींगची माहिती घेऊन, मिळत्या जुळत्या मिसींग बाबत तपास केला. मयताचे फोटो हे जिल्हातील सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर पाठविले व शहरात व ग्रामीण जिल्ह्यात गोपणीय बातमीदार नेमले. असता व्हॉट्सअप च्या मॅसेज नुसार माहिती मिळाली की, सदर ईसम हा छत्रपती संभाजीनगर शहरातील आहे.

त्यावरुन तपास केला असता गोपणीय बातमीदार यांच्याकडुन माहिती मिळाली की, सदरचे प्रेत हे शेख आवेश शेख परवेज वय 25 वर्षे रा. विठ्ठल मंदिर जवळ, कसबा चौक, ता. जि. जालना ह.मु. छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालय समोरील फुटपाथ, ता.जि. छत्रपती संभाजीनगर याचे असल्याबाबत माहीती मिळाली त्यावरून त्याचे नातेवाईकांची भेट घेवून माहीती घेतली असता दिनांक 25/05/2026 रोजी सकाळचे वेळी मयत शेख आवेश शेख परवेज हा त्याचा मित्र शेख फैयाज रा. किरडपुरा याचे सोबत त्याचेकडील काळया रंगाचे स्कुटीवर घेवून गेला असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन मयताची पत्नि हिचे फिर्यादीवरुन पो.स्टे. चिकलठाणा येथे गुरनं 296/2026 कलम 103(3), 3(5) भा. न्या मंहीता 2023 प्रमाणे दिनांक 27/05/2026 रोजी गुन्हा नोंद झालेला आहे.

सदर मिळालेल्या माहीतीची पडताळणी करून संशयीत आरोपीचा शोध घेतला, संशयीत इसम नामे शेख फैयाज शेख महेमूद वय 26 वर्षे यास दिनांक 27/05/2026 रोजी त्याचे घरी गल्ली नं.4 रेहमानिया कॉलनी राम मंदीराजवळ किरडपुरा छत्रपती संभाजीनगर येथुन शिताफीने ताब्यात घेतले त्यास अधिक विश्वासात घेऊन विचारपुस करता त्याने गुन्हा कबुल करुन मयत शेख आवेश हा माझा मित्र असून त्याचा माझ्या पत्नीवर वाईट नजर होती. माझी पत्नीची त्याने छेड काढली होती त्याला मी समजावले होते परंतु तो एकत नव्हता. त्याचा मला खुप राग आला होता.

दिनांक 25/05/2026 रोजी सकाळी 08.00 ते 08.30 वाजताचे दरम्यान मी व माझा मित्र मयत शेख अवेश असे आम्ही दोघे दारु पित होतो त्याला मी माझ्या पत्नीची छेड काढतजावु नको असे समजावले परंतु त्याने माझ्या सोबत भांडण सुरु केले रागाच्या भरात मी शेख आवेज याचे डोक्यात दगड मारुन ठार मारले. त्यानंतर मी तेथुन घरी निघुन गेलो. असे सांगुन गुन्हा कबुल केला. त्यास ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी करुन सदर गुन्ह्यांचे अधिक तपास कामी पोलीस ठाणे चिकलठाणा येथे सदर आरोपीस हजर केले. असून अधीक तपास पोस्टे चिकलठाणा येथील पोलीस करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री. प्रकाश भा. जाधव, मा.अपर पोलीस अधिक्षक श्री, प्रशांत स्वामी, यांचे मार्गदर्शनाखाली पुजा नागरे, उपविभागीय पो. अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विजयसिंह राजपुत, पो.उपनि. महेश घुगे, पोह/ कासीम शेख, सचिन राठोड, सुनिल गोरे, बलविर बहुरे, शिवाजी मगर, निलेश कुडे, पो.स्टे. चिकलठाणा येथील पोलीस निरीक्षक राजेद्रं बनसोडे, पो. उपनि. श्रिनिवास धुळे व अमंलदार यांनी केली आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link