एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

कोथळी-सालबर्डी गावाजवळ भीषण दुचाकी अपघात; एकाचा जागीच मृत्यू, दोघे जखमी

कोथळी-सालबर्डी गावाजवळ भीषण दुचाकी अपघात; एकाचा जागीच मृत्यू, दोघे जखमी

प्रतिनिधी | प्रणित काठोके
मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी-सालबर्डी गावाजवळ दोन दुचाकींच्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून दोघे जखमी झाल्याची घटना २४ मे २०२६ रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, पवन नामदेव चौधरी हे कोथळी येथून मुक्ताईनगरकडे आपल्या मोटरसायकल क्रमांक एमएच 19 एएच 483 ने जात होते. त्याचवेळी कोथळी येथील रहिवासी नामदेव प्रल्हाद भिल हा त्याच्या ताब्यातील मोटरसायकल क्रमांक एमएच 19 डीजी 9923 घेऊन हॉटेल योगायोगजवळील सबस्टेशनकडून भरधाव वेगाने मुख्य रस्त्यावर आला. यावेळी त्याने पवन नामदेव चौधरी यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या भीषण धडकेत पवन नामदेव चौधरी हे रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले. नागरिकांनी तत्काळ त्यांना उपजिल्हा रुग्णालय मुक्ताईनगर येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.

या अपघातात अन्य दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी फिर्यादी प्रदीप प्रकाश चौधरी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून नामदेव प्रल्हाद भिल यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत कलम 106(1), 281, 125(a), 125(b), 324(4) तसेच मोटार वाहन अधिनियम 184 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link