एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

कल्याणमध्ये ३४ कोटीचे हेरॉईन जप्त:,मुख्य तस्कारासह पाच जण जेरबंद

कल्याणमध्ये ३४ कोटीचे हेरॉईन जप्त:,मुख्य तस्कारासह पाच जण जेरबंद

प्रतिनिधी मुकुंद मोरे

कल्याणमध्ये अंमली पदार्थांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल ३४ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉईन जप्त केले आहे. पोलीस उपायुक्तांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने गेल्या महिन्यात दोन सराईत तस्करांना अटक केली होती.

या आरोपींकडून मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी तपासाची साखळी पुढे नेत मुख्य सूत्रधारासह आणखी तीन तस्करांना जेरबंद केले. या कारवाईदरम्यान पोलिसांनी एकूण ९ किलो ७६८ ग्रॅम हेरॉईन (गर्द) जप्त केले असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे ३४ कोटी १८ लाख ८४ हजार रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले. कल्याण परिसरात मागील अनेक वर्षांत हेरॉईनविरोधात झालेली ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.

अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी पोलीस अधिक तपास करत असून या रॅकेटचे राज्याबाहेरील कनेक्शनही तपासले जात आहेत. या कारवाईमुळे अंमली पदार्थांच्या जाळ्यावर मोठा आघात बसल्याची प्रतिक्रिया पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link