रोहित दादा पवार यांची छावा संघटना अकोला उपाध्यक्ष निवृत्ती पाटील यांनी पुणे येथे सदिच्छा भेट
विशेष प्रतिनिधी निळकंठ वसू पाटील :
सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेल्या छावा संघटना अकोला जिल्ह्याच्या उपाध्यक्ष निवृत्ती पाटील यांनी पुणे येथे युवा नेते Rohit Pawar यांची सदिच्छा भेट घेतली.
या भेटीदरम्यान राज्यातील युवकांचे प्रश्न, सामाजिक उपक्रम तसेच संघटनात्मक विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. युवकांनी सामाजिक कार्यात पुढाकार घेऊन समाजहितासाठी कार्य करावे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
निवृत्ती पाटील यांनी रोहित दादा पवार यांच्या कार्याचे कौतुक करत भविष्यात युवकांसाठी विविध उपक्रम राबविण्याबाबत चर्चा केली. भेटीच्या प्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.








