एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

पिंप्री अकराऊतजवळ ट्रकला भीषण आग; एकाचा होरपळून मृत्यू, चालक बचावला

पिंप्री अकराऊतजवळ ट्रकला भीषण आग; एकाचा होरपळून मृत्यू, चालक बचावला

जळगाव उप संपादक| प्रणित काठोके

मुक्ताईनगरकडून मलकापूरकडे जात असलेल्या एका ट्रकला भीषण आग लागून झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी (दि. 21 मे 2026) रात्री पिंप्री अकराऊत गावाजवळ घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक क्रमांक GJ 25 W 4226 हा पशुखाद्य घेऊन मुक्ताईनगरहून मलकापूरकडे जात होता. दरम्यान पिंप्री अकराऊत गावाजवळ ट्रकचा भीषण अपघात झाला. अपघात होताच ट्रकने अचानक पेट घेतल्याने काही क्षणांतच आगीने विक्राळ रूप धारण केले.
अपघातानंतर ट्रक चालकाने प्रसंगावधान राखत गाडीतून उडी मारून स्वतःचे प्राण वाचवले. मात्र ट्रकमधील दुसऱ्या व्यक्तीला अपघातामुळे बाहेर पडता न आल्याने त्याचा आगीत होरपळून मृत्यू झाला. जखमी चालकावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
घटनेनंतर स्थानिक नागरिक व प्रशासनाने तातडीने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले. मोठ्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.
दरम्यान, ट्रकला आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस व फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link