एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

मीना बाजारात मुलींना त्रास देणाऱ्या टवाळखोरांवर दामिनी पथकाचा कारवाईचा दणका

मीना बाजारात मुलींना त्रास देणाऱ्या टवाळखोरांवर दामिनी पथकाचा कारवाईचा दणका

प्रतिनिधी संगीता ईनकर

मागील चार दिवसात 19 टवाळखोरांवर मुंबई पोलीस अधिनियम ११०/११७ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दामिनी पथक प्रमुख पोलीस उप निरीक्षक पल्लवी जाधव यांना गुप्तबातमीदारामार्फत माहिती मिळाली की. मीना बाजारात काही टवाळखोर मुलींना त्रास देत आहेत त्यावरून दामिनी पथक हे मीना बाजारात दाखल झाले साध्या वेशात पथक बाजारात गस्त करत असताना काही टवाळखोर मुलींच्या मागे मागे फिरणे, काहीतरी हावभाव किंवा इशारे करताना मिळून आले. त्यांना पोस्टे बीड शहर येथे हजर करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तसेच बाजाराच्या बाहेरच्या आवारात ही काही टवाळखोर मिळून आले. त्यांना सर्वांना ताब्यात घेवून पोस्टे शिवाजीनगरला हजर करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांचे समुपदेशनही करण्यात आले आहे अशा एकूण 19 टवाळखोरांवर मागील चार दिवसात मुंबई पोलीस अधिनियम कलम ११०/११७ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली

सदर कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नवनीत कावत सर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली PSI पल्लवी जाधव, सहायक फौजदार मीरा रेडेकर, पोलीस हवालदार शोभा जाधव, चालक पोलीस शिपाई अक्षय जाधव सर्व दामिनी पथक बीड यांनी केली

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link