भंडारा जिल्हा हादरला, भावाच्या मृत्यूनंतर वाहिनीसोबत झिंगाट… लग्नाला नकार दिराने वाहिनीला संपविले
भंडारा जिल्हा हादरला, भावाच्या मृत्यूनंतर वाहिनीसोबत झिंगाट… लग्नाला नकार दिराने वाहिनीला संपविले, भंडारा जिल्हा
अनुजा कारखेले-देवरे प्रतिनिधी
भंडारा जिल्ह्यांतून दिराच्या आणि वहिनीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. दिराचं आणि भावजयचे नातं हे बहिण भावाप्रमाणे प्रमाणे असतं मात्र सख्या दिराचं नातं हे वहिनीसोबत अनैतिक संबंधातून आणि लग्नाचा हट्ट दिराने आपल्या वहिनी कडे केला होता… मात्र वहिनीने दिरानला लग्नास नकार देताच दिराने आपल्या वहिनीचा गळा दाबून खून केल्याची घटना लाखांदूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून समोर आली आहे. माधुरी तुळशीदास अंबादे (वय 30) असे या मृत महिलेचे नाव आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून माधुरीच्या पतीचे पाच वर्षांपूर्वी निधन झाले होते. आणि तिचा दिर गौरव आणि आठ वर्षाच्या मुलीसोबत पालांदूर ( जिल्हा भंडारा ) येथील एका विवाह सोहळ्याला आली होती. घरी परतताना उशीर झाल्यामुळे (दि.26) एप्रिल च्या मध्यरात्री तिघेही भांगडी भागातील नातेवाईकांच्या घरी मुक्कामाला थांबले होते. यावेळी माधुरी आणि दिर गौरव यांच्यात पहिल्यापासून प्रेम संबंध होते. मात्र माधुरीने आपल्या सख्या दिराला लग्नाला नकार दिल्याने दिराने तिच्या 8 वर्षीय चिमुरडीच्या डोळ्यादेखत मध्यरात्री माधुरीच्या तोंडावर उशी दाबून तिचा गळा आवळून खून केला आहे. या भीषण घटनेनंतर आरोपी दिर गौरव हा घटनास्थळावरून फरार झाला होता. मात्र लाखांदूर पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र पोलिसांनी अगदी शिताफीने तपास करून आरोपी दिराच्या मुसक्या आवळल्या आहेत. वहिनी आणि दिराच्या या प्रेम संबंध आणि लग्नाला नकार देताच दिराने वाहिनीचा खून झाल्यामुळे भागडी परिसरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. अधिक तपास लाखांदूर पोलीस करीत आहेत.*








