एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

डॉ. विजय सूर्यवंशी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला

डॉ. विजय सूर्यवंशी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला

! संभाजी पुरीगोसावी पुणे जिल्हा  प्रतिनिधी . पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला जवळपास सात महिन्यानंतर नव्या आयुक्तांची वर्णी लागली आहे. कोकण विभागीय आयुक्त म्हणून असलेले डॉ. विजय सूर्यवंशी यांची पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत तसा आदेश शासनाचे सहसचिव सुभाष उमराणीकर यांनी बुधवारी जाहीर केला होता. डॉ. सूर्यवंशी हे 2006 बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत त्यांचे शालेय शिक्षण सातारा सैनिक स्कूल तसेच नाशिक जिल्ह्यातील देवळा येथील जिल्हा परिषद शाळेत झाले पुढे त्यांनी उच्च शिक्षण पूर्णता:- केले आहे. 9 मार्च 2012 रोजी औद्योगिक विकास महामंडळ (एनआयडीसी) येथे सह मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी प्रशासकीय सेवेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी राज्यांतील अनेक महत्त्वांच्या पदांवर काम करीत प्रशासनात छाप पडली आहे. कोल्हापूर पालघर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी असताना ग्रामीण भागात विकासकांच्या विविध योजनांना गती दिली. त्यानंतर गोंदिया रायगड जिल्हाधिकारी म्हणून काम करताना प्रशासनातील पारदर्शकता व विकास प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. आज सकाळी त्यांनी अतिरिक्त आयुक्त श्रावण हुर्डीकर यांनी त्यांचे स्वागत करीत पदभार सोपविला आहे. तत्कालीन आयुक्त शेखर सिंह यांची नाशिक येथे कुंभमेळा बदली होती. श्रावण हर्डीकर यांच्याकडे अतिरिक्त आयुक्त म्हणून पदभार देण्यात आला होता. अखेर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला डॉ. विजय सूर्यवंशी यांची आता नव्याने नियुक्ती झाली असून. अखेर त्यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त कार्यालयात हजर राहून आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link