मानवत पो.स्टे. मध्ये अज्ञात चोरा विरोधात गून्हा दाखल.
*मानवतशहरातील क्रांतिचौकात दरोडा ; सोन्याचे दागीणे घेऊन चोरट्यांनी पोबारा केला*
*{ मानवत / अनिल चव्हाण. }*
——————————
15 तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लांबविले
तब्बल तीन दिवसांनी मानवत पोलिसात गुन्हा दाखल.
सविस्तर वृत्त असे की,
मानवत शहरातील मध्यवर्ती भाग असलेला येथील *क्रांती – चौक* भागात हि घटना घडली.
मानवत शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या *क्रांती – चौक* या भागातील एका घरातून 15 तोळे सोन्याचे दागिण्यावर चोरट्यानी हात साफ केला. शहरात या भागात नेहमी वरदळ असते पण चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना दिनांक ११ मार्च रोजी उघडकीस आली होती.
या प्रकरणी मानवत पो.स्टे. मध्ये १४ मार्च रोजी आज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
शहरात चौका चौकात मानवत नगर परिषदेने अद्यावत सी.सी.टि.व्ही. यंत्रना असून ही एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
मानवत शहरात चोरांनी पोलिसांपूढे आवाहन उभे केले अल्याने सर्वसामान्यातुन आश्चर्य
व्यक्त केले जात आहे.
मानवत येथील *वासूदेव बाकळे* हे आपल्या पत्नीसह १ मार्च रोजी पुणे येथे आपल्या मुलाकडे गेले होते. १० मार्च रोजी शेजाऱ्यांनी घराच्या दरवाज्याचे कुलूप तुटलेले असल्याचे बाकळे यांना सांगितले त्या नंतर मानवत मध्ये असलेल्या आपला पुतण्या अजिंक्य बाकळे याला घरी पाठवून शहानिशा करून घेतले असता घरात चोरी झाल्याचा प्रथम दर्शनी दिसून आल्याने याची माहिती तात्काळ *वासुदेव बाकळे* यांना दिली. दिनांक ११ मार्च रोजी पुण्याहून आल्या नंतर घराची पाहणी केली असता कपाटात ठेवलेले १५ तोळे सोन्याचे दागिने ज्याची खरेदी किंमती प्रमाणे *दोन लाख ब्यानव्व हजार* चोरीला गेल्याचे दिसून आले. याप्रकरणी *वासुदेव बाकळे* यांच्या तक्रारी वरून अज्ञात चोरटे विरुद्ध मानवत पो.स्टे. मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास मानवत पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक मा. संदीप बोरकर पाटील हे करीत आहेत.
शहरात चोरांचा वाढता राबता बघून शहरातील नागरीक भयभित होत आहे.
या भागात पोलिस गस्त वाढविण्याची गरज असल्याची मागणी शहरातील नागरिकातून होत आहे.
****








