एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

वाढदिवस साजरा करायचा म्हणून प्रवाशांकडे खंडणी आरोपींच्या बंडगार्डन पोलिसांनी आवळल्या मुसक्या ! बंडगार्डन पोलिसांची कामगिरी

वाढदिवस साजरा करायचा म्हणून प्रवाशांकडे खंडणी आरोपींच्या बंडगार्डन पोलिसांनी आवळल्या मुसक्या ! बंडगार्डन पोलिसांची कामगिरी,

प्रतिनिधी संभाजी पुरीगोसावी

वाढदिवस साजरा करण्यासाठी प्रवाशाकडुन खंडणी उकाळणा-या टोळीला घेतले ताब्यात

बंडगार्डन पोलीस स्टेशन तपास पथकाची कामगिरी

फिर्यादी नामे धनिष कुमार हेरंद्र प्रसाद वय २२ वर्षे, व्यवसाय सेंट्रींग काम, रा बांलगंधर्व चौक, कुलकर्णी यांचे बांधकाम साईट, डेक्कन, पुणे मुळ रा ग्राम जहाँगिरपुर, पोस्ट सुमई शाहपुर, थाना बनीयापुर, जिल्हा छपरा सारंग, बिहार यांचा मित्र नामे सत्येंद्र महतो वय ४१ वर्षे रा शंकरपुर टोला, चकीया, सिवान, बिहार यांना रिक्षामधील चार अनोळखी इसमांनी मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी देवुन त्याची पत्नी हीचेकडुन ऑनलाईन २५,०००/- रु मागवुन घेतल्याने रिक्षामधील चार अनोळखी इसमाविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाणे गु.र.नं. ४०/२०२६ भा. न्याय संहिता कलम ३०८ (५).३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

नमुद गुन्हा लवकरात लवकर उघडकिस आणण्याचे दृष्टीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष पांढरे, बंडगार्डन पोस्टे यांनी तपास पथकाचे अधिकारी व पोलीस अंमलदार यांना योग्य त्या सुचना मार्गदर्शन केले होते.

तपास पथकातील अधिकारी व अंमलदार दाखल गुन्हयाचा तपास करीत असताना तांत्रीक तपास व सीसीटीव्ही फुटेजव्दारे संशयीतांचा गुलटेकडी परीसरात शोध घेत असताना संशयीत इसम नामे १. गणेश आण्णा जगधने वय २९ वर्षे रा. डायसप्लॉट कॅनॉल, गुलटेकडी, पुणे २. अमोल उत्तम गायकवाड वय ३२ वर्षे रा. डायसप्लॉट कॅनॉल गुलटेकडी, पुणे यांना दिनांक २५/०२/२०२६ रोजी ताब्यात घेवुन कसुन चौकशी करता त्यांनी गुन्हयाची कबुली दिली असुन आरोपीतांना दिनांक २५/०२/२०२६ रोजी अटक करण्यात आली. तपासा दरम्यान त्यांचे गुन्हयातील सहकारी यांचेबाबत माहिती दिल्याने इसम नामे १) अतुल रविंद्र गायकवाड वय ३८ वर्षे अंदाजे रा. रा. डायसप्लॉट कॅनॉल गुलटेकडी, पुणे २) संतोष राधाकिशन सरोदे वय ३१ वर्षे अंदाजे रा. डायसप्लॉट कॅनॉल गुलटेकडी, पुणे यांना दि. २७/०२/२०२६ रोजी अटक करण्यात आलेली असुन मा. न्यायालयाने सर्व आरोपींना दिनांक ०२/०३/२०२६ रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दाखल गुन्हयाचे तपासा मध्ये आरोंपीतांकडुन गुन्हा करतेवेळी वापरलेली रिक्षा व गुन्हयातील खंडणी स्वरुपात घेतले रक्कमेपैकी १०,०००/- रुपये जप्त करण्यात आलेले आहेत. दाखल गुन्हयाचा अधिक तपास चालु आहे.

सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त सो, पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा सोो, पोलीस सह. आयुक्त, मा. मनोज पाटील सोो, अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग पुणे, मा. श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५, मा. श्रीमती संगिता आल्फान्सो शिंदे सो।, सहाय्यक पोलीस आयुक्त लष्कर विभाग, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक धिरज गुप्ता, पो.अं. प्रदिप शितोळे, सारस साळवी, प्रकाश आव्हाड, महेश जाधव, ज्ञानेश्वर बडे, मनिष संकपाळ, मनोज भोकरे, शिवाजी सरक, ज्ञानेश्वर गायकवाड, यांचे पथकाने केली आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link